सूचनांचे पालन करून पायी वारी काढणारच, वारकऱ्यांची टोकाची भूमिका 

गोपाल मोटघरे
मंगळवार, 8 जून 2021

शासनाने पायी वारी नेण्यासाठी निर्बंध घालून परवानगी द्यावी अन्यथा वारीला येणारा समाज अनियंत्रित असेल आणि त्यावेळी काही कायदा सुवस्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील असं कराडकर म्हणाले.

पुणे - याहीवर्षी आषाढीवरीवर कोरोनाचे Corona सावट आहे. त्यामुळे मागील वर्षी प्रमाणे सर्व प्रमुख सोहळ्याच्या पादुका थेट बस मधून नेण्यासाठीचा प्रस्ताव शासनांकडून देण्यात आला होता. मात्र  सर्व सोहळा प्रमुखांनी त्याला नकार देत पायी वारी Wari करण्याची आग्रही भूमिका मांडली होती, त्यानुसार  सर्व मागण्याचा विचार करून शासनाने गठीत केलेल्या समितीने आपला अहवाल मंत्रिमंडळाकडे पाठवला असल्याची माहिती मिळत आहे. By following the instructions we will arrange pandharpur wari

मात्र त्या अहवालावर निर्णय येण्या आधीच वारकऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करतआषाढी वरी पायी नेणार अस म्हटलं आहे. वारकऱ्यांचे नेते हभप बंडातात्या कराडकर bandatatya karadkar यांनी या बाबदची माहिती दिली आहे.

पोलिसांच्या जाचाला कंटाळून इसमाने केला आत्महत्येचा प्रयत्न...

शासनाने पायी वारी नेण्यासाठी निर्बंध घालून परवानगी द्यावी अन्यथा वारीला येणारा समाज अनियंत्रित असेल आणि त्यावेळी काही कायदा सुवस्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील असं कराडकर म्हणाले.

कराडकर यांनी मांडलेली ही भूमिका केवळ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठीची असल्याने इतर सोहळ्यातील पालखी प्रमुख बंडातात्या कराडकर यांच्या मागणीला पाठिंबा देतात का यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. By following the instructions we will arrange pandharpur wari

हे देखील पहा -

दुसरीकडे, सर्व पालखी सोहळे वेगवेळ्या वाटेने जाणार असल्याने प्रशासनावर ताण येणार असेल तर सर्व पालख्या एकाच मार्गावरून नेल्या जाव्यात , अशी ऐतिहासिक आणि धाडसी प्रस्ताव सोहळ्यातील मुख्य मानकरी राजा भाऊ चोपदारांनी मांडून शासना समोर आणखी एक पर्याय ठेवला आहे. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणी शासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live