95 वर्षीच्या आजीबाईने इच्छाशक्तीच्या बळावर केली कोरोनावर मात

95 वर्षीच्या आजीबाईने इच्छाशक्तीच्या बळावर केली कोरोनावर मात
95 year

लातुर : एकीकडे कोरोनामुळे Corona तरुणांच्या Young मुत्यूचे Mortality प्रमाणात वाढत असल्याच्या घटना समोर येत असताना लातुर Latur जिल्ह्यातील औसा Ausa तालुक्यातील बेलकुंड येथे एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. तब्बल 95 वर्षाच्या Year Old गंगाबाई बाबुराव कुंभार या आजीबाईने Grandmother चक्क घरात उपचार घेवून कोरोनावर यशस्वी मात Overcome केली आहे.  95 Year Old Grandmother Overcomes Corona 

गंगाबाई कुंभार या ९५ वर्षाच्या आजीबाईंना गेल्या पंधरा दिवसांपुर्वी सर्दी, ताप व खोकला याचा त्रास होत असल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी त्यांची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली असताना त्यांना पुढील उपचारासाठी बेलकुंड येथील रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला होता.

हे देखील पहा -

मात्र मनाने कणखर असलेल्या गंगाबाई यांनी घरात राहुनच उपचार घेणार असल्याचा निर्णय घेतला व या निर्णयाशी कुटुंबातील इतर सदस्य सहमत असल्याने त्यांचा बेलकुंड प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या औषध उपचार घेत घरातच उपचार सुरू करण्यात आला. 95 Year Old Grandmother Overcomes Corona 

यावेळी आपल्या व कुटुंबातील इतर सदस्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून गंगाबाई या स्व:ताचे कपडे, भांडे धुवत असत. या काळात ग्रामपंचायतीने दक्षता घेत सरपंच विष्णू कोळी, ग्रामसेवक विकास फडणीस यांनी गंगाबाई कुंभार यांच्या घराचे निर्जंतुकीकरण करत कुटुंबातील सर्व सदस्यांची कोरोना चाचणी बेलकुंड प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांनी केली.

या मध्ये कुटुंबातील इतर तिघांनाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र कुटुंबातील इतर लोकांनीही घरी राहूनच उपचार घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान पंधरा दिवसाच्या कालावधीत कुंभार कुटुंबातील लोकांनी आवश्यक औषध उपचार घेत आरोग्याची काळजी घेतली. 95 Year Old Grandmother Overcomes Corona 

यामध्ये घरातील इतर कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांसह ९५ वर्षाच्या गंगाबाईने घाबरून न जाता कोरोनावर मात केली असून या आजीबाईची प्रकृती ठणठणीत आहे. सध्या या ९५ वर्षाच्या गंगाबाई घरी बसून चिंचा फोडण्याचे काम करीत आहेत.

एकंदरीत सध्या कोरोना रुग्णांनी  घाबरून न जाता खंबीरपणे या कोरोना महामारीविरुद्ध लढा दिल्यास आपण यावर सहजपणे मात करु शकतो. यासाठी ९५ वर्षाच्या गंगाबाईचे हे ज्वलंत उदाहरण सध्या या परिसरात सकारात्मक चर्चेचा विषय ठरला आहे. 
 

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com