रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबेना; शिक्रापुरात 4 इंजेक्शनसह एकजण ताब्यात

रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबेना; शिक्रापुरात 4 इंजेक्शनसह एकजण ताब्यात
Shirur

शिरूर : कोरोना Corona महामारीच्या संकटात औषधांचा काळाबाजार Blackmarket अजुन थांबण्याचे नाव घेत नाही.  शिरुर Shirur तालुक्यातील बजरंगवाडी येथे एक युवक, बेकायदेशीर रेमडेसिवीर Remdesivir इंजेक्शनच्या Injection विक्रीसाठी Sale आला असताना शिक्रापुर Shikrapur पोलीस Police पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात Arrest घेतले आहे. Black Market Of Remdesivir In Shikrapur One Arrested With 4 Injections

त्याच्याकडे चार रेमडेसिवीर इंजेक्शन मिळाले असून अमित पवार असे आरोपी चे नाव आहे. तो मुळाचा बीड जिल्हातील परळी तालुक्यातील असल्याचे समोर आले आहे. या रेमडेसिवीर रॅकेटमध्ये अजून कोणा कोणाचा सहभाग आहे का याचा कसून तपास आता शिक्रापूर पोलिस करत आहेत.

हे देखील पहा -  

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच  रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असल्याने रेमडेसिवीर विक्रीचे रॅकेट शिरुर परिसरात जोरदार पद्धतीने कार्यरत आहे. Black Market Of Remdesivir In Shikrapur One Arrested With 4 Injections

त्यामुळे रुग्णांचे नातेवाईकही औषधांची खातरजमा न करताच गरज असल्याने नाईलाजाने रेमडेसिवीर विकत घेत आहेत.  मात्र कोरोना महामारीच्या काळात औषधांचा काळाबाजार रोखण्याचे पुणे ग्रामीण पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. 

कोरोना रुग्णांची गरज लक्षात घेऊन अमित पवार हा तरुण एक इंजेक्शन २५ हजार रुपयांना विक्री करत होता. मात्र पोलीसांच्या सतर्कतेमुळे आज रेमडेसिवीर विक्रीतुन होणारी फसवणूक एका प्रकरणातून थांबली असली तरी इतरत्र याच पद्धतीने होणारी फसवणूक पोलीस कशी थांबणार हे पहावे लागणार आहे. 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com