खेड तालुक्यात पुरवठ्याअभावी लसीकरण राहणार बंद

खेड तालुक्यात पुरवठ्याअभावी लसीकरण राहणार बंद

राजगुरुनगर : खेड तालुक्यात कोरोनाचा दिवसेंदिवस विस्कोट होत चालला असुन तालुक्यातील राजगुरुनगर,चाकण, आळंदी अशा तीन नगरपरिषद व चाकण औद्योगिक वसाहत व ग्रामीण भागात आज कोरोनाचे रुग्ण तीन पटीने वाढले आहे अशातच आजपासुन लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे त्यामुळे नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये असे आवाहन आरोग्य आधिकारी बळीराम गाढवे यांनी दिली आहे. Corona Vaccination Halted in Khed Tehsil of Pune District

चाकण औद्योगिक वसाहत व शहरीभागातील कोरोनाचा उद्रेक ग्रामीण डोंगराळ भागात होऊ लागला आहे. काल ६८३ रुग्णां नोंद झाली असुन ३१७६ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर २६५ जणांचा मृत्यु झाला आहे. 

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण मोहिम युद्धपातळीवर सुरु असताना आज पासुन खेड तालुक्यात लसीचा तुटवडा असल्याने आजपासुन लसीकरण होणार नसल्याचे आरोग्य विभागाकडुन स्पष्ट करण्यात आले आहे. Corona Vaccination Halted in Khed Tehsil of Pune District

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे यासाठी खेड तालुक्यातील आरोग्य यंत्रणा लसीकरणासाठी गाव पातळीवर युद्ध पातळीवर काम करत असतानाच कालपासुन अचानक लसींचा तुटवडा जाणवु लागल्याने आजपासुन लसीकरण बंद ठेवण्यात आहे.

Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com