उपाशीपोटी पाणी पिणे आरोग्यास लाभदायक 
Drinking water on an empty stomach is good for health

 उपाशीपोटी पाणी पिणे आरोग्यास लाभदायक 

Skin Car Tips: उन्हाळ्यात भरपूर पाणी Water पिणे आरोग्यासाठी लाभदायक Beneficial असते. पाणी पिण्याचे अनेक फायदे Benefits आहेत. पाणी प्यायल्याने शरीराची पचनशक्ती Digestion सुरळीत राहण्यास मदत होते.  तसेच भरपूर प्रमाणात पाणी प्यायल्याने आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. आपल्या शरीरात 60 टक्के पाण्याचे प्रमाण असते. शरीरातील पचन, रक्तभिसरण Circulation, शरीरातील तपमानांचे नियंत्रण, इतर पदार्थांचे विसर्जन होण्यासाठी पाणी शरीरासाठी आवश्यक आहे. (Drinking water on an empty stomach is good for health)

हे देखिल पहा - 

तज्ञांच्या माहितीनुसार रोज सकाळी झोपेतून उठल्यावर सर्वात आधी पाणी प्यावे. सकाळी उपाशीपोटी पाणी प्यायल्याने अनेक फायदे होतात. 

- सकाळी उपाशीपोटी पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ  बाहेर पडण्यास मदत होते. 

- शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण होण्यास मदत होते. 

- याचा फायदा चेहरा चमकदार दिसण्यास होतो.

- बरेच जणांना बद्धकोष्ठतेचा त्रास असतो. यासाठी भरपूर प्रमाणात पाणी आवश्यक आहे. 

- वजन कमी करायचे असल्यास सकाळी उपाशी पोटी तीन ग्लास पाणी प्यावे. 

इतर अनेक फायदे :

नियमित सकाळी उठून उपाशीपोटी पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत चालते. त्यासोबतच वजनही कमी होण्यास मदत होते. पाणी प्यायल्याने त्वचेची समस्या दूर होते. आंघोळ केल्यानानंतर पाणी प्यायल्याने रक्तदाबाचा त्रास होत नाही. यामुळे आपल्या शरीराची ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. नियमितपणे रात्री झोपण्याआधी अर्धा ग्लास पाणी प्यायल्याने हृदयविकारा धोका कमी होतो. 

भरपूर प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरात ऑक्सीजनचे प्रमाण वाढून रकतभिसरण चांगले होण्यास मदत होते. पाणी पितांना नेहमी बसून प्यावे. पाणी उभे राहून प्यायल्याने गुडघे दुखण्याची समस्या निर्माण होऊ शकते. 

तसेच पाणी पितांना बाटलीद्वारे न पिता एखाद्या ग्लासमध्ये टाकून व्यवस्थित बसून तोंड लाऊन प्यावे. शरीराच्या तापमानापेक्षा पाण्याचे तापमान कधीच कमी असायला नको. उन्हाळ्यात अनेकांना सवय असते की घरात आल्या-आल्या फ्रीज मधील थंडगार पाणी पितात. यामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात नुकसान होते.   

Edited By - Puja Bonkile 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com