कोरोनाची लाट आणि पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी ?

कोरोनाची लाट आणि पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी ?
How to boost the immune system in the monsoon season

मुंबई : या रोगराईच्या काळात निरोगी आयुष्य सर्वानाच गरजेचे झाले आहे. आपल्या आरोग्याची Health विशेष काळजी घेण्याची गरज सध्याच्या कोरोना Corona काळात गरजेचे आहे. कोरोना पासून लांब राहायचं एकच मंत्र आहे तो आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे. How to boost the immune system in the monsoon season

रोगप्रतिकारक Immune system शक्ती चांगली असेल तर आपण कोरोनाच्या संसर्गापासून दूर राहू शकतो. या काळात आहारात असा पदार्थांचा समावेश करा, ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. पावसाळा Monsoon आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान रोगप्रतिकारशक्ती चांगली कशी ठेवावी? 

-  निरोगी आयुष्यासाठी सकाळी लवकर उठणे आपल्या खूप फायदेशीर असते. आपण योग-श्वासाचा व्यायाम सकाळी उठून केला पाहिजे.

-  आपल्या आरोग्यासाठी चालणे हे खूप चांगले असते. चालण्याचा व्यायाम दररोज कमीत कमी ४५ मिनिटांसाठी तरी आपण केला पाहिजे.

-  सध्याच्या या कोरोना काळात आपण पौष्टिक अन्नाचे सेवन केले पाहिजे. मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाणे शक्यतो टाळाच.

- कोरोनाला दूर ठेवायचे असेल तर बाहेरचे जेवण टाळा. घरी तयार केलेला सकस आहार आपण घेतला पाहिजे.

- आपल्या आरोग्यासाठी ड्राय फ्रूट्सचे सेवन फायदेशीर आहे. यामुळे दररोज संध्याकाळी बदाम, अक्रोड, काजू चे सेवन करावे.

- रात्री उशीरा जेवण केल्यामुळे आरोग्यासाठी विविध समस्या निर्माण होतात. त्यामुळे रात्रीचे जेवन सायंकाळी साडे सहा ते सातच्या आतमध्ये केले पाहिजे.

- कोरोनामुळे सध्या मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर बाळगणे अतिरिक्त फायद्याचे आहे. शक्यतो घराच्या बाहेर जाणे टाळा. मात्र, घराच्या बाहेर निघताना मास्कचा वापर केला पाहिजे.

- आपल्या चांगल्या आरोग्यासाठी हळदीचे दूध हे खूप फायदेशीर आहे. यासाठी आपण हळदीच्या दुधाचा आहारात समावेश केला पाहिजे. हळदीचं दूध पिणे  म्हणजे सगळ्या रोगांना स्वतःपासून दूर ठेवणे आहे. 

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com