कोविडच्या भारतीय व्हेरिअंटचा ४४ देशांत प्रसार
Indian Covid 19 virus variant found in 44 countries says WHO

कोविडच्या भारतीय व्हेरिअंटचा ४४ देशांत प्रसार

जागतिक आरोग्य संघटनेने WHo बुधवारी सांगितले की, जगातील अनेक देशांत भारताच्या स्फोटक प्रादुर्भावाचा कोविड -१९ हा प्रकार सापडला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य एजन्सीने The UN health agency म्हटले आहे की, कोविड -१९  B.1.617 हा भारतामध्ये ऑक्टोबर महिन्यात सापडला होता. डब्ल्यूएचओ मधील  एकूण ४४ देशामधील ओपन एकसेस डेटा बेस वर तेव्हा ४५०० नमुने देण्यात आले होते.  Indian Covid 19 virus variant found in 44 countries says WHO

आणि आता डब्ल्यूएचओ ला आणखीन ५ देशांमधून सुद्धा हा प्रकार शोध लागल्याची बातमी प्राप्त झाली आहे. भारताच्या बाहेर ब्रिटन Britain मध्ये या विषाणूचे सर्वात जास्त प्रकार आढळून आले आहेत अशी माहिती समोर आली आहे. 

हे देखिल पहा - 

हा विषाणूचा प्रकार त्याच्या मूळ प्रकारांपेक्षा अधिक धोकादायक आहे असे म्हणले जात आहे, कारण ते अधिक लवकर संक्रमित होतात. तसेच जास्त प्राणघातक देखील असतात.    Indian Covid 19 virus variant found in 44 countries says WHO

डब्ल्यूएचओ ने B.1.617 हा प्रकार या प्राणघातक विषाणूच्या यादीत समाविष्ट केला आहे कारण हा मूळ विषाणूपेक्षा लवकर संक्रमित होतो. आणि अनेक देशांमध्ये याचे प्रमाण वाढत चालले आहे. 

कोरोना हा भारतामध्ये वाढत चालला आहे. नवी दिल्ली New Delhi सह मुंबई Mumbai मध्येही संख्या दुसऱ्या लाटेत वाढली आहे. परिणामी आरोग्य सुविधा प्रचंड ताणली गेली आहे. कोरोनाने सर्वात जास्त  नुकसान भारताला झाले आहे. त्या पाठोपाठ अमेरिकेला America २३ दशलक्ष लोक यामुळे संक्रमित झाले आहेत.

Edited By- Sanika Gade  
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com