International Tea Day 2021: एक कप चहा आजून होऊन जाऊद्या.. 

International Tea Day 2021: एक कप चहा आजून होऊन जाऊद्या.. 
International Tea Day 2021 Peek into Worlds oldest beverage

21 मे हा दुसरा आंतरराष्ट्रीय चहा दिवस आहे. या दिवसाचे औचित्य साधून मग होऊन जाऊद्या अजून एक कप चहा... International Tea Day 2021 Peek into Worlds oldest beverage

चहा उत्पादनात भारताचे India जगात एक वेगळे स्थान आहे. आपण बऱ्याच प्रमाणत चहा Tea तयार करतो. आपण सुमारे 80% चहा वापरतो आणि उर्वरित चहाची निर्यात करतो. आपला भारत देश चहासाठी एक मोठी बाजारपेठ असल्याचे दिसून येते. परंतु खरं तर आपण चहा उत्पादनाच्या वरच्या 10 क्रमांकामध्ये सुद्धा नाही आहोत.

चहाचे आपले दरडोई सेवन 750 ग्रॅम इतके कमी आहे; याची तुलना करता यूकेमधील UK जवळपास 2 किलो आहे, किंवा इराणमधील Iran सुमारे 1.5 किलोग्राम किंवा तुर्कीशी Turkey केल्यास या वर्षामध्ये ती 3.5 किलोग्रामवर म्हणजेच पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच, आपण सीटीसी वापरतो ज्याला जे मास-मार्केट आहे, आणि हे ऑर्थोडॉक्स किंवा संपूर्ण पानांच्या चहापेक्षा कमी किंमतीत आहे . International Tea Day 2021 Peek into Worlds oldest beverage

हे देखील पहा -

२१ मे, २०२१ रोजी जगातील लोक आंतरराष्ट्रीय चहा दिवस International Tea Day साजरा करण्यासाठी एकत्र येतात. चहाचा वाढता वापर करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. चहाचे औषधी मूल्य असून यामध्ये लोकांमध्ये आरोग्यासाठी फायदे देण्याची क्षमता असल्याचे यूएनने United Nation म्हटले आहे. २०१९ मध्ये, संयुक्त राष्ट्रांनी जगातील सर्वात जुन्या पेय पदार्थांचे महत्त्व सांगितले आहे. 

या उत्सवाचे औचित्य साधून यूएनने ट्विटरवर आपले अभिवादन सांगितले: "चहा अनेक संस्कृतींमध्ये महत्त्वाचा असतो आणि यामुळे रोजगार, निर्यात कमाई आणि अन्नसुरक्षेला हातभार लागतो."

यूएनने चहाच्या औषधी गुणांना नुसते ओळखले नसून त्याला विकास लक्ष्य कार्यक्रमाचा Sustainable Development Goal programme एक महत्त्वाचा घटक मानले आहे. चहा जगातील भूक आणि दारिद्र्य निर्मूलनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल अशी त्यांची आशा आहे.

यूएनच्या अन्न व कृषी संघटने कडून (एफएओ) आंतरराष्ट्रीय चहा दिन साजरा केला जातो.  International Tea Day 2021 Peek into Worlds oldest beverage

याआधी, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, व्हिएतनाम, इंडोनेशिया, केनिया, मलावी, मलेशिया, युगांडा, भारत आणि टांझानिया या देशांमध्ये या चहा उत्पादक देशांमध्ये १५ डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय चहा दिवस म्हणून साजरा केला जात असे. पण नंतर संयुक्त राष्ट्रसंघाने 21 मे रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले. कारण म्हणजे चहा उत्पादनाचा हंगाम मे मध्ये बहुतेक चहा उत्पादक देशांमध्ये सुरू होतो.

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com