नॉन-स्टिक भांडे वापरता काय ? परंतु लोखंडी भांडीच आहेत आरोग्यासाठी जास्त सुरक्षित  

नॉन-स्टिक भांडे वापरता काय ? परंतु लोखंडी भांडीच आहेत आरोग्यासाठी जास्त सुरक्षित  
iron

मुंबई: असे मानले जाते की, घरगुती अन्न Homemade Food हे सर्वात पौष्टिक आहे आणि हे सत्य देखील आहे. घरी ताज्या भाज्या आणणे, स्वयंपाक करणे आणि आरोग्याची चांगली काळजी घेणे हि चांगली सवय आहे. सर्वांना हे माहित आहे की आपण जे खातो त्याचा आपल्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. परंतु आपणास माहित आहे का, आपण कोणत्या भांडीमध्ये पदार्थ शिजवतो याचा आपल्या आरोग्यावरही परिणाम होतो. Iron utensils are safer to cook for maintaining good health

आजच्या स्वयंपाकघरात नॉन-स्टिक Non-Stick भांडी मिळतील. या भांड्यांचा फायदा असा आहे की अन्न त्यांच्यात चिकटत नाही. तसेच धुण्यास सुद्धा जास्त वेळ लागत नाही आणि अशी भांडी आजकाल सर्वच ठिकाणी सहजतेने मिळतात. तथापि, नॉन-स्टिक भांडीमध्ये बनविलेले अन्न आरोग्यास हानी सुद्धा पोहोचवू शकते. ही भांडी बनवण्यासाठी वापरली जाणारी रसायनेही अन्नात आढळतात. पूर्वीच्या काळात लोक स्वयंपाक करण्यासाठी फक्त चिकणमाती किंवा लोखंडी भांडी Clay or iron utensils वापरत असे .

 हे देखील पहा -

लोखंडी भांड्यात बनविलेले अन्न खूप पौष्टिक असते. त्यात अन्न शिजवण्याचे बरेच फायदे आहेत. लोहाचे भांडे अन्नामध्ये असे काही घटक सोडतात, ज्यामुळे बरेच रोग बरे होतात. त्यात बनविलेले अन्न खाल्ल्यास हिमोग्लोबिनची Hemoglobin पातळीही वाढते. एवढेच नव्हे तर ते आपल्यात रक्त आणि लोहाची कमतरता देखील दूर करते. Iron utensils are safer to cook for maintaining good health

लोखंडी भांड्यात स्वयंपाकाचे फायदे; 

१. जर तुम्हाला शरीरात त्रास होत असेल तर लोहाच्या भांड्यात अन्न शिजवण्यास सुरवात करा. हे आपल्या शरीरात होणार्‍या वेदना पासून मुक्त करेल. या भांड्यातून सोडण्यात येणारे घटक शरीरातील वेदना कमी करण्यासाठी कार्य करतात.

२. जर तुम्हाला शारीरिक अशक्तपणा जाणवत असेल तर लोखंडी भांड्यात स्वयंपाक करणे हा एक चांगला पर्याय आहे. यामुळे तुमची शारीरिक दुर्बलता दूर होते. तुमच्या शरीराला सामर्थ्य मिळते.

3. जर तुम्हाला त्वरीत थकल्यासारखे जाणवत असेल तर लोखंडाच्या भांड्यात अन्न शिजवून खाण्यास सुरवात करा. यामुळे तुमचा सर्व थकवा दूर होईल. त्यात शिजवलेले जेवण खाल्ल्यानंतर तुमच्या शरीरात ऊर्जा येईल.

४. ज्यांना सांधेदुखीची समस्या आहे. त्यांनी दररोज लोखंडी भांड्यात तयार केलेले आहार घ्यावे. 

५. पोटाशी संबंधित काही समस्या असल्यास लोखंडी भांड्यात तयार केलेले अन्न  खाणे हा एक चांगला पर्याय आहे.

६. पीरियडमध्ये Menstrual cycle महिलांना बर्‍याच वेदनांचा सामना करावा लागतो. लोखंडी भांडी मधून शिजवलेले अन्न खाल्ल्यास या वेदनांपासून आराम मिळतो.

Edited By- Sanika Gade

 
No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com