पोटदुखीवर दिले ‘रेबिज’चे इंजेक्शन ; GMC त जर तुम्ही उपचारासाठी जात असाल तर सावधान

पोटदुखीवर दिले ‘रेबिज’चे इंजेक्शन ; GMC त जर तुम्ही उपचारासाठी जात असाल तर सावधान

अकोला : जीएमसीत जर तुम्ही उपचारासाठी जात असाल, तर आता वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण पोट दुखीवर इलाज करण्यासाठी गेलेल्या एका रुग्णावर थेट रॅबीजचे (कुत्र चावल्यास द्यावे लागणारे) इंजेक्शन देण्यात आल्याच धक्कादायक प्रकार बुधवारी समोर आला आहे. याबाबत रुग्णांनी वैद्यकीय अधीक्षकांकडे रितसर तक्रार दाखल केली असून, यावर काय कार्यवाही होते हे पाहणे अगत्याचे ठरणार आहे. 

राहुल रवींद्र वाकोडे (28, रा.मिलिंद नगर) यांच्या पोटात दुखत होते. त्यानंतर त्यांचे मित्र रितेश यादव यांनी त्यांना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वाेपचार रूग्णालयात दाखल केले. त्यानूसार त्यांना वार्ड 109 येथे जाऊन रॅनटॉक्सचे इंजक्शन घेण्याचा सल्ला देण्‍यात आला. मात्र दरम्यान कर्तव्यावर असलेल्या एका वैद्यकीय अधिकाऱ्यांने रुग्णाला विचारपूस न करता त्याला रॅबीजचे इंजेक्शन दिल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात वाकोडे यांचे मित्र रितेश यादव यांनी ‘सकाळ’ला माहिती देताना सांगितले की, रुग्णांच्या जीवाशी खेळ करणार हा प्रकार आहे. त्यामुळे संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करावी. जेणे करून भविष्यात असा प्रकार उद्भवणार नाही. यासंदर्भातील लेखी तक्रार सुद्धा वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे केल्याचे त्यांनी सांगितले. 

रुग्णाची प्रकृती चिंताजनक 
राहुल वाकोडे यांना रॅबिजचे इंजेक्शन दिल्यानंतर त्यांना काही आैषधी देऊन रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यासंदर्भात त्यांचा आप्तेष्टांशी संपर्क केला असता पोटातील दुखने कायम असून राहूल यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याच्या जीवीताला काही झाल्यास इंजेक्शन देणारे डॉक्टर त्याला कारनीभूत ठरतील, असा आरोप सुद्धा करण्यात आला आहे. 

यासंदर्भात यादव यांची तक्रार प्राप्त झाली आहे. सदर प्रकरणाची चौकशी केली जाईल. चाैकशीअंती दोषी आढळल्यास संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर नियमानूसार कारवाई केली जाईल. 
- डॉ. श्यामकुमार सिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी, अकोला

Web Title: marathi news akola health instead of stomach ache doctor gave rabies injection

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com