VIDEO | एक अशी 'दारू' ज्याने तुमचं लिव्हर राहिल फीट...

VIDEO | एक अशी 'दारू' ज्याने तुमचं लिव्हर राहिल फीट...

दारू पिणं म्हणजे आरोग्याची राखरांगोळी करून घेणं, असंच समजलं जातं. आणि त्यात तथ्यही असल्याचं समोर आलंय. मात्र,  आता एक अशा प्रकारचं अल्कोहोल बनवलंय की त्यापासून तयार होणारी दारू तुमच्या शरीरावर काहीच परिणाम करणार नाही, असा दावा केला जातोय.

दारू पिने से लिव्हर खराब होता है, अमिताभ बच्चनचा हा डायलॉग सगळ्यांनाच माहीत आहे. मात्र, आता अशी दारू तयार केलीय. ज्या  दारूमुळे लिव्हरवर काहीच परिणाम होणार नाही, असं म्हटलं जातंय..आणि अशी दारू विकसित केलीय एका मराठी माणसानं. तेही नागपूरमध्ये.
अनिरुद्ध कपोले असं या तज्ज्ञाचं नाव. दोन दशकांच्या संशोधनानंतर त्यांनी हे अल्कोहोल विकसित केलंय. विशेष म्हणजे हे अल्कोहोल  पूर्णपणे हर्बल असल्याचा दावा ते करतात.

हे अल्कोहोल आरोग्यासाठी उत्तम आहे. याच्या सेवनानंतरही आक्रमकता नियंत्रणात राहते. कोणत्याही रसायनांचा किंवा कृत्रिम रंगांचा वापर त्यासाठी केलेला नाही..या अल्कोहोलमुळे हँगओव्हरही होत नाही. मानवी शरीराला त्याचे तब्बल 50 फायदे होतात, असं कपोलेंचं म्हणणंय.
या अल्कोहोलचा वापर करून आतापर्यंत अनेक प्रकारची मद्य तयार केलीत. यापुढे तर त्यांचा बियरही विकसित करण्याचा प्रयत्न आहे. त्यांनी केलेले दावे जर खरे ठरत असतील, तर ते एक महत्त्वाचं संशोधन ठरेल. मात्र, तरीही दारू पिणाऱ्यांनी मापातच प्यायलेली बरी.

Web Title - An 'alcohol' that will keep your liver fit .

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com