फुफ्फुसात अडकलेली सेफ्टी पीन काढण्यात डॉक्टरांना यश

फुफ्फुसात अडकलेली सेफ्टी पीन काढण्यात डॉक्टरांना यश

गोव्यातील तरुणीच्या फुफ्फुसात अडकलेली सेफ्टी पीन काढण्यात डॉक्टरांना यश आलंय. मुंबईमध्येया तरुणीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. स्कार्फ परिधान करताना अनवधानाने तोंडात धरलेली पिन या तरुणीनं चुकून गिळली होती. चेंबूर येथील झेन मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी या तरुणीच्या फुफ्फुसात ६ दिवस अडकून असलेली पिन यशस्वीपणे बाहेर काढली. 

ही तरुणी मुळची गोव्याची असून 21 रोजी ही तरुणी मडगावमधील तिच्या घरी बहिणीला स्कार्फ बांधण्यासाठी मदत करत होती. यावेळी तिने सेफ्टी पिन तिच्या तोंडात पकडली होती. मात्र, अनावधनाने ही पिन तिच्या घशात गेली आणि फुफ्फुसात जाऊन अडकली.

दरम्यान, झालेल्या घटनेनंतर या तरुणीला गोव्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. एन्डोस्कोपीच्या माध्यमातून ही पिन काढण्याचा अयशस्वी प्रयत्नही झाला. त्यानंतर या तरुणीला मुंबईत उपचारासाठी आणण्यात आलं होतं 

Webtitle : marathi news doctors successfully removed pin stuck in lungs of goan girl 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com