झोमॅटो, स्विगीवरही आता केंद्राची 'नजर'

झोमॅटो, स्विगीवरही आता केंद्राची 'नजर'

नवी दिल्ली : झोमॅटो, स्विगी, बिगबास्केट, ग्रोर्सस् आणि उबेरइट यांसारख्या फुड डिलेव्हरी करणाऱ्या कंपन्या सध्या आघाडीवर आहेत. या कंपन्यांकडून खाद्यपदार्थांची घरपोच डिलिव्हरी केली जात असल्याने तरुणाईसोबतच इतरांसाठीही फायद्याचे ठरत आहे. मात्र, आता या कंपन्यांवर केंद्र सरकारची नजर असणार आहे. त्यामुळे यासाठी 'फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथोरिटी ऑफ इंडिया'कडून नवा नियम आणण्याची तयारी सरकारने केली आहे.

झोमॅटो, बिगबास्केटसारख्या कंपन्यांच्या माध्यमातून सर्व प्रकारचे भारतीय खाद्यपदार्थांसह इतर खाद्यपदार्थ पुरविले जात आहेत. या ई-कॉमर्स कंपन्यांसाठी सरकारकडून विविध नियम आणले जात आहेत. 'फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथोरिटी ऑफ इंडिया'ने (एफएसएसएआय) नवे मार्गदर्शक तत्वे जारी केले आहेत. या मार्गदर्शक तत्त्वानुसार ऑनलाईन फूड विक्रेत्या कंपन्यांवर याचा थेट परिणाम होणार आहे.

दरम्यान, 'एफएसएसएआय'कडून रेस्टॉरंट आणि कॅफेसाठी यापूर्वीच मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली. त्यानंतर आता झोमॅटो, स्विगी, बिगबास्केट, ग्रोर्सस् आणि उबेरइट यांसारख्या ऑनलाईन फूड विक्रेत्या कंपन्यांसाठी ही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात येणार आहे. 

रेस्टॉरंट्सना ऑक्टोबरमध्ये सूचना

केंद्र सरकारकडून देशातील 10,500 रेस्टॉरंट्सना याबाबतच्या मार्गदर्शक सूचना ऑक्टोबर, 2018 मध्ये यापूर्वीच देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कार्यवाही करण्याचे सुरु आहे.  

काय आहेत ही मार्गदर्शक तत्त्वे ?

- केव्हीही खाद्यपदार्थांची तपासणी करता येऊ शकते.

- फक्त ताजे खाद्यपदार्थ डिलिव्हरी करायला हवी.

- 'एफएसएसएआय'ने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार वस्तूची माहिती देणे बंधनकारक असेल.

- अखेरच्या टप्प्यात डिलिव्हरी करणारी व्यक्ती प्रशिक्षित असावी.

- अन्नाची सुरक्षा ही यातील महत्वाची बाब असेल. त्यादृष्टीने काळजी घ्यायला हवी.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com