आपल्या आवडत्या व्यक्तीला मिठी मारा, डॉक्टरला दूर ठेवा...

आपल्या आवडत्या व्यक्तीला मिठी मारा, डॉक्टरला दूर ठेवा...

रोज एक किलोमीटर धावा आरोग्यदायी रहा... एक सफरचंद खा आजारांना दूर ठेवा, या आरोग्यदायी म्हणी तुम्ही आम्ही रोज ऐकतो. पण तुम्हाला कुणी एक मिठी मारा आणि आरोग्यदायी राहा असं सांगितलं तर? 

पहिल्यांदा तर तुम्ही त्याला वेड्यात काढाल. ऐकायला विचित्र असलं तरी हे खरं आहे. कारण अमेरिकेतल्या कार्नेगी मेलन विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनात मिठीचे माणसावर सकारात्मक परिणाम दिसून आलेत.

आवडत्या माणसानं मिठी मारल्यास शारिरीक आणि मानसिक ताकद वाढत असल्याचं या संशोधनात म्हटलंय. वैद्यकीय भाषेत प्लासिबो थेरेपी नावानं ओळखली जाणारी ही उपचार पद्धती खूपचं फायदेशीर असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

सरसकट कुणालाही मिठी मारणं फायदेशीर नाहीच हे ही डॉक्टर सांगायला विसरत नाहीत. पण मिठीमुळे उपचारात खूप फायदे होत असल्याचंही डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यामुळं येत्या काळात डॉक्टर औषधांसोबत प्रिय व्यक्तीला मिठीत घ्या हे ही सांगतील अशी शक्यता आहे.
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com