घटस्फोटासाठी एचआयव्हीचे विषाणू महिलेच्या शरीरात सोडले

घटस्फोटासाठी एचआयव्हीचे विषाणू महिलेच्या शरीरात सोडले

पिंपरी (पुणे) : हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. पैसे मिळत नसल्याने तिच्याकडे घटस्फोटाच्या मागणीसाठी तगादा लावला. घटस्फोट मिळवण्यासाठी विवाहितेच्या शरीरात एचआयव्हीचे विषाणू सोडण्यात आले. ही धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव परिसरात घडली.

पिंपळे सौदागर परिसरात राहणाऱ्या 27 वर्षीय विवाहितेने याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पडवळ नगर, थेरगाव येथे राहणारा  तिचा पती, सासरा आणि सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिलेचा विवाह मे 2015 मध्ये झाला. त्यानंतर कुटुंबातील आरोपी यांनी आपसात संगनमत करून व्यवसाय करण्यासाठी माहेरवरून पैसे आणण्याची वेळोवेळी मागणी केली. त्यापैकी काही पैसे प्राप्तही करून घेतले. मात्र त्यांची मागणी वाढत गेल्याने फिर्यादी महिलेने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे तिला शिवीगाळ करून मारहाणही करण्यात आली. पैसे मिळत नसल्याने तिचा घटस्फोटासाठी छळ करण्यात आला. फिर्यादी महिला आजारी असताना सलाईनमधून तिच्या एचआयव्हीचे विषाणू सोडण्यात आले. यामुळे ती महिला एचआयव्ही बाधीत झाली आहे. याबाबत अधिक तपास उपनिरीक्षक संगीता गोडे करीत आहेत.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com