लॉकडाऊनमुळे महिलांवर मानसिक परिणाम, वाचा काय आहेत कारणं...

लॉकडाऊनमुळे महिलांवर मानसिक परिणाम, वाचा काय आहेत कारणं...

सध्या घ्रारातले सर्व जण घरी असल्याने त्यांची काळजी घेण्याचा ताण महिलांवर येतोय. त्यातल्या त्यात कामवाल्या बायकांनाही सुट्टी अशातच ऑफिसचं काम असा सर्व लोड महिलांवर आल्याने त्यांच्यावर मानसिक तणाव येतोय. अशा काही  केसेस समोर आल्यात.

लॉकडाऊन असल्यामुळे कुटुंबातले सगळेच जण घरीच आहेत. त्यात सुट्टी असल्यामुळे लहान मुलांची आणि कुटुंबातल्या इतर व्यक्तींची जबाबदारी घरातल्या महिलांवर आलीये. ज्या महिला नोकरी करतात त्यांना वर्क फ्रॉम होम देण्यात आलंय. त्यामुळे या महिलांना घर सांभाळून दिवसभर घरून ऑफिसचं काम करावं लागतंय. यामुळे त्यांच्यावरचा ताण वाढतोय.

महिलांचा ऑफिस जाण्या-येण्याच्या वेळेची वर्क फ्रॉम होममुळे बचत होतेय, त्यामुळे त्यांच्याकडून जास्त कामाची अपेक्षा ठेवली जातेय. तसंच घरात काम करणाऱ्यांना भांडी वलय बाई किंवा जेवण बनवणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुट्टी दिल्यामुळे  या कामाचा संपूर्ण ताण घरातल्या महिलांवर येतोय. त्यात पुरुष मंडळींचा घरकामात काहीही सहभाग नसल्यामुळे सर्व कामं महिलांनाच करावे लागत आहेत.

महिला सध्या ऑफिस आणि घर या दोन्हीचं काम सोबत करत आहेत. त्यामुळे त्यांना स्वतःसाठी वेळच नाहीये. महिलांना लहान मुलांना, घरातल्या वृद्ध व्यक्तींना सांभाळावं लागतंय त्यासोबत ऑफिसचं कामही करावं लागतंय. त्यामुळे महिलांवर या गोष्टींचा अतिरिक्त ताण येतोय.

अतिरीक्त कामामुळे शारिरीक मानसिक थकवा

महिलांना घरकाम करून त्यानंतर वर्क फ्रॉम होम करावं लागतंय. घरकाम केल्यामुळे महिलांवर शारीरिक ताण येतोय. तर ८-१० तास ऑफिसचं काम केली केल्यामुळे महिलांवर मानसिक ताणही येतोय. त्यामुळे सध्या महिला या दोन्ही समस्यांचा सामना करत आहेत.

लॉकडाऊनमुळे बच्चेकंपनी आणि इतर कुटुंबीय घरी असल्यामुळे महिलांवर त्यांना काय हवं नको हे बघण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे महिलांच्या कामात अतिरिक्त वाढ झाली आहे. महिलांच्या या 'अनपेड' कामाचा अंदाजही लावणं कठीण आहे. मात्र इतक्या तणावातही महिला चोखपणे आपलं काम करत आहेत.

लॉकडाऊनमध्ये घरचं आणि ऑफिसचं काम करूनही कधीही न थकणाऱ्या महिलांना यामुळे सलाम करावाच लागेल.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com