अपत्य जन्माच्या काळात पुरुषच होतात अधिक चिंताग्रस्त....

अपत्य जन्माच्या काळात पुरुषच होतात अधिक चिंताग्रस्त....
Worried Man

वॉशिंग्टन : जागतिक आरोग्य संघटनेच्या एका नवीन संशोधनानुसार पितृत्वामधील संक्रमणाबद्दल पुरूषांमधील (Male) चिंतेचा प्रसार तुलनेने व्यापक असल्याचे आढळून आले आहे. Men Are relatively more depressed while going towards Parental Phase

पुरूषांमधील बदलाचे हे निष्कर्ष ‘सायकोसोमॅटिक प्रसूती व स्त्रीरोगशास्त्र’ या नियतकालिकात प्रकाशित करण्यात आले आहेत. कोलोरॅडो विद्यापीठाच्या (University of Colorado) स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या अभ्यासानुसार संशोधकांनी मूल जन्माला येण्याच्या कालखंडातील पुरूषांच्या चिंतेचा अभ्यास केला, .‘पुरूषाचे पितृत्वाकडे स्थित्यंतर होणे मानवी जीवनातील महत्त्वाची बाब आहे. तिचा संबंध नेहमी आर्थिक आव्हाने, नातेसंबंध, काम व कार्यशैलीशी निगडीत समस्यांशी असतो. 

समकालीन अनेक गोष्टींशी दोन हात करत पालकत्वाची जबाबदारी पार पाडावी लागत असते. या महत्त्वाच्या काळातील बदल स्त्री (Female) आणि पुरुष (Male) दोघांमध्येही होत असले, तरी नविन होऊ घातलेल्या पालकांमध्ये नैराश्याचे प्रमाण फारसे आढळून आले नसल्याचे पब्लिक हेल्थचे प्राध्यापक जेन लेफर्मन (Jane Leferman) यांनी सांगितले. संशोधकांनी १९९५ ते २०२० दरम्यान प्रकाशित झालेल्या चाळीस हजाराहून अधिक पात्र सहभागींच्या संशोधनाचे पुनरावलोकन केले. 

मूल जन्माला (Child Birth) येण्याच्या कालावधीत पुरूष चिंताग्रस्त होण्याचे अंदाजे दर ११ टक्के होता तर, पहिल्या वर्षाच्या ११.७ टक्के दराच्या तुलनेत गर्भधारणेदरम्यान चिंताग्रस्त असण्याचा दर ९.९ टक्के इतका होता. जागतिक आरोग्य संघटनेच्या क्षेत्रिय व्यापार दरापेक्षा हे प्रमाण जास्त आहे. पुरुषांमध्ये  नैराश्याचे प्रमाण २.२ ते ३.८ टक्क्यांपर्यंत आहे, तर गर्भधारणेच्या काळात अंदाजे १७.६ टक्के महिला अशा अनुभवातून जात असतात असे संशोधकांना आढळून आले आहे. पालकत्वामुळे पुरुषांमध्ये नैराश्याचा धोका वाढू शकतो, असे अभ्यासातून पुढे आले आहे. 

आपली संस्कृती पुरूषप्रधान असल्याने पुरूषांच्या नैराश्याबद्दल किंवा चिंताग्रस्ततेबद्दल आजही समाजात फारसे मोकळेपणाने बोलले जात नाही. मात्र स्रियांच्या तुलनेत आत्महत्या करण्याचे किंवा मद्यपानाचे प्रमाण पुरूषांमध्ये जास्त असल्याचे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे.

पुरुषांच्या मानसिक आरोग्याबद्दल आपण अधिक पारदर्शकता निर्माण करणे महत्वाचे आहे. सकारात्मक जागरूकतेची आशा व्यक्त करत लोकांना गरजेच्या आगोदर मदत करण्यावर भर देणार आहे. यासाठी योग्य आधार तसेच या समस्येची खूप लवकर ओळख आणि योग्य उपचार प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे प्राध्यापक लेफर्मन यांनी सांगितले. Men Are relatively more depressed while going towards Parental Phase

Edited By - Digambar Jadhav
 

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com