Narcissistic disorder : अति लाड, प्रेमाने मुलांमध्ये विकृत मानसिकता वाढण्याचा धोका सर्वाधिक 

Narcissistic disorder : अति लाड, प्रेमाने मुलांमध्ये विकृत मानसिकता वाढण्याचा धोका सर्वाधिक 
npd.jpg
;

अकरा वर्षाच्या कमलने त्याच्या मित्राची  टॉय कार तोडली. मित्राची टॉय कार तोडल्यानंतर जेव्हा त्याची आई त्याच्यावररागवली तरी त्याला  काहीच फरक पडला नाही, असे त्याच्या हावभावावरुन स्पष्ट दिसून आले.  आपल्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही, आपल्यासारखे कोणी असूच शकत नाही, असा त्याचा गैरसमज झाला होता आणि ही भावना टिकवून ठेवण्यासाठी, एखाद्याचे नुकसान करायचे असेल तर तेही करायला तो मागेपुढे पाहत नसे,  हे  झाले उदाहरण, मात्र आपल्या आसपास अशी अनेक मुले नकळतपणे यासर्व गोष्टी करत असतात.  चिंताजनक बाब म्हणजे जे पालक आपल्या मुलांना 'अति महत्त्व देतात, म्हणजेच त्यांना ओव्हर व्ह्यॅल्यू देतात,   अशा मुलांमध्ये - अंर्तमुग्धता  (स्वतःच्याच विचारात असलेली)  निर्माण होऊन हीच अंतमुग्धता कालांतराने विकृत मानसिकेतेत बदलू शकते. असे एक अभ्यासातून समोर आले आहे.  (Narcissistic disorder: Pampering, loving children are at the highest risk of developing a perverted mindset) 

 • नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी​ डिसऑर्डर Narcissistic Personality disorder म्हणजे काय?

नार्सिसिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर (एनपीडी) म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःवर जास्त प्रेम करते, स्वत: ची प्रशंसा करते, स्वत: ची कदर करते आणि स्वत: च्या गरजा, इच्छा आणि स्वार्थाची काळजी घेते.

 • नार्सिसिस्टिक डिसऑर्डरचे परिणाम ?

- जर मुलांमध्ये अतिआत्मविश्वास निर्माण झाला तर असे मूल कोणाशीही जवळचे आणि विश्वासू नातेसंबंध निर्माण करू शकत नाही.  सहानुभूती म्हणजे इतरांच्या भावना समजून घेण्याची त्यांची प्रवृत्ती    त्याला कोणाजवळही येऊ देत नाही.
- अशी मुलं कधीच दुसर्‍याच्या मताशी सहमत नसतात. त्यांना त्यांचे मत सर्वात योग्य असल्याचे वाटते. 
- अंर्तमुग्ध मुले स्वत: ला खूप विशेष मानतात. त्याची कलागुण विशेष आहे आणि त्याच्यासारखा दुसरा कोणीही असू शकत नाही,  ही कल्पना त्याच्यात खोलवर रुजली असते.

- अशी मुले सामाजिक वातावरणात राहू शकत नाहीत  कारण अशी मुले इतर कोणालाही महत्त्व देत नाहीत. 

 • अंर्तमुग्ध वर्तनाचे मूळ कुठे आहे?

अंर्तमुग्ध मुलांमध्ये, मला जे पाहिजे आहे ते मिळणारच, मी सर्वोत्कृष्ट आहे,  मला कोणीही दुसरे कोणीही समजावून सांगू शकत नाही, पराभव म्हणजे काय ही त्यांना माहितीच नसते. अशा भावना मुलांमध्ये  निर्माण करणाऱ्या पालकांमध्येच या अंर्तमुग्ध वर्तनाचे मूळ असते. 

 • जास्त लाड करणे

मुलाची चूक न पाहता, त्याच्या चुका लपवून ठेवणे, त्यांनी मागितलेली गोष्ट, वस्तु लगेच त्यांना आणून देणे,  चूक केल्यावर त्यांना रंगावण्याएवजी त्यांचे समर्थन करणे ही नार्सिसिस्टिक डिसऑर्डरची काही सामान्य कारणे आहेत. त्यामुळे अशी मुले,  या समस्येचा बळी बनतात. मुलांना असे वाटू लागते की ते जे काही करतात त्यांचे पालक त्यांचे समर्थनच  करतील. म्हणूनच ते काहीही चुकीची कामे करण्यास  प्रवृत्त होतात. 

 • कोणत्याही परिस्थितीत मीच जिंकणार अशी भावना निर्माण होते  

अशा प्रकारच्या मुलांना नेहमीच अव्वल स्थानी राहायचे असते. मग त्यासाठी ते कोणत्याही प्रकारची बेईमानी करायलाही तयार होतात. आपला पराभव, मागे राहणे त्यांना मान्य नसते. बालपणात, जेव्हा मुले एखादा खेळ खेळतात तेव्हा पालक त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी नेहमीच जिंकू देतात. मग त्यांची हीच मागणी वाढत जाते. मात्र चिंताजनक बाब म्हणजे, वास्तविक जीवनात किंवा कोणत्याही खेळामध्ये जेव्हा ही मुले मागे पडण्यास सुरुवात होते, त्यावेळी अशी मुळे तणाव आणि नैराश्याचे बळी ठरतात आणि मागे पडतात. 

 • अती संरक्षणात्मक

बरेच पालक आपल्या मुलांची अतिकाळजी घेतात आणि त्यांचे अति संरक्षण करतात. त्यांना इतर कोणत्याही व्यक्तीने आपल्या मुलास समजावून सांगणे किंवा निंदा करणे आवडत नाही. म्हणूनच, मुलांसाठी पालक ही बऱ्याचद आजूबाजूच्या लोकांशी भांडत असतात. कालांतराने अशा मुलांना वडिलांकडूनही मार्गदर्शन घेणे आवडत नाही.

 • वाढत्या अपेक्षा

जेव्हा पालक मुलांकडून मोठ्या अपेक्षा बाळगतात, तेव्हा मुलाने स्वत: ला ओव्हर  स्मार्ट  अतिहुशार समजायला  सुरुवात करतात. अशावेळी ते इतरांच्या भावनांचा विचार करत नाहीत. यामुळे, त्यांचे मित्रही कमी असतात आणि झाले असले तरी  ते त्यांच्यापासून खूप लवकर दूर होतात, म्हणजेच ते मैत्रीचे नाते फार काळ टिकू शकत नाही. 

 • निदान म्हणजे काय?

अंर्तमुग्ध मुलांमधील असे वर्तन वेळीच ओळखले गेल्यास यावर निदान करणेही तितकेच सोपे होते. मात्र मुले मोठी झाल्यानंतर अशा गोष्टी आढळून आल्या तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वामधील गुंतागुंत आणि त्यांचे असे वर्तन पुनः ठीक करणे ही अवघड बनू शकते. तथापी,  संज्ञानात्मक वर्तन थेरपी हा यावर निदान करण्याचा एक मार्ग आहे.

 • मुलाची मर्यादा प्रथम  घरातील  मोठ्यांनीच  ठरवल्या पाहिजेत. 

आपल्या मुलाची मर्यादा जाणून घ्या, त्यांना अष्टपैलू बनवण्याचा किंवा परिपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करू नका. 

तू एक अप्रतिम काम केले असे म्हणण्याऐवजी 'ते चांगले काम केले, असे सांगा, ज्यामुळे मुलांना वास्तविकतेचे भान राहील.  

 •  इतरांशी चांगले वागणे 

लोकांनी आपल्याशी चांगले वागावे यासाठी आपणही लोकांशी चांगलेच वागले पहिजे, अशी शिकवण मुलांना दया. ज्यामुळे ते इतरांच्याही भावना समजू शकतील. 

 • लगेच काही आणून देऊ नका 

मुलांनी मागीतल्याबरोबर त्यांना हवी असलेली वस्तु आणून देऊ नका. त्यांना त्या वास्तुसाठी  थोडासा धीर धरावा लागेल असे सांगा.  

 • पराभव स्वीकारण्याची त्यांची मानसिक तयारी करा 

खेळ असो, अभ्यासाचे निकाल किंवा कोणतेही काम, जिंकण्याचा प्रयत्न किंवा उच्च गुण मिळवणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु दुसर्‍याच्या परिश्रम किंवा त्याच्या जिंकण्याचा हेवा करणे हे योग्य नाही, यांची मुलांना जाणीव करून दया. 

Edited By- Anuradha Dhawade 

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com