डायटिंग सोडा आणि आहारात या 6 गोष्टींचा समावेश करा

डायटिंग सोडा आणि आहारात या 6 गोष्टींचा समावेश करा
Quit dieting and include these 6 things in your diet

Health Care : वजन कमी weight loss करण्यासाठी लोक बरेच उपाय करतात.  परंतु तुम्हाला हे माहित आहे का वर्कआउट workout न करता देखील तुम्ही वजन weight  कमी करू शकता. यासाठी तुम्हाला आहारात Diet काही गोष्टींचा समावेश करावा लागेल. ज्यामुळे तुमचे वजन कमी weight loss  होतेच तसेच ते कायमचे नियंत्रित देखील राहते. चला अशा काही गोष्टी जाणून घेऊया - Quit dieting and include these 6 things in your diet

दही - curd 
उन्हाळ्यात दही खाणे फायदेशीर ठरते. दही वजन कमी करण्यास मदत करते. दही पोषक घटकांनी भरपूर असून ,शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते. तसेच दही खाल्याने लवकर भूक लागत नाही. दह्यामध्ये कॅल्शियम ,  व्हिटॅमिन बी 2 ,व्हिटॅमिन 12,  बी 2, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यासारखे पोषक घटक असतात. दही खाल्याने पचनक्रिया सुरळीत राहते. 

ताक - Taak 
ताकामध्ये बैक्टीरिया, कार्बोहाइड्रेट आणि लेक्टोज पोषक घटक असतात. यामुळे शरीराची  रोगप्रतिकरक शक्ती वाढते. ताक प्यायल्याने वजनावर नियंत्रण मिळवता येते. तसेच ताक आपल्याला आवडीनुसार पिता येते. तसेच जेवण करतांना देखील ताकाचे सेवन करता येते.  

हे देखील पहा - 

लौकी - Gourd
लौकी ही एक प्रकारची भाजी आहे. उन्हाळ्याच्या दिवसात ही भाजी पचायला हलकी आणि आरोग्यास लाभदायी असते. तसेच आपले वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते. लौकीमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे असे पोषक घटक आढळतात. तसेच यात व्हिटॅमिन ए,व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि झिंक यासारखे पोषक तत्वे असतात.  

लिंबू - Lemon
उन्हाळ्यात लिंबू पाण्याचे  जास्तीत जास्त सेवन केले जाते. यामुळे शरीसार ऊर्जा मिळते. तसेच वजनकमी करण्यास मदत करते. लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकरक शक्ती वाढण्यास मदत मिळते. तसेच लिंबामध्ये औषधी गुणधर्म देखील असतात. सकाळी उठून लिंबू पाणी प्यायल्याने दिवसभर ताजेतवाने वाटते आणि शरीरात पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते. 

बदाम - Almonds
बदाममध्ये पाच ग्रॅम प्रथिने असतात. बदाम व्हिटॅमिन ई, फाइबर, ओमेगा 3फॅटी एसिड, ओमेगा 6 फॅटी एसिड आणि प्रथिने यासारखे पोषक पदार्थ मुबलक प्रमाणात असतात. उन्हाळ्यात भिजलेल्या बदामांचे सेवन करावे. बदाम वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. कारण बदाम खाल्ल्याने तुमची अतिरीक्त भूक नियंत्रणात राहते. तसेच भूक लागली असल्यास बदाम खाल्ल्याने अवेळी शरीरात जाणारे चुकीचे फॅट जात नाही. त्यामुळेच वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. 

Edited By - Puja Bonkile 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com