रेमडेसिवीरही कोरोना उपचाराच्या यादीतून होणार बाद होण्याच्या वाटेवर

रेमडेसिवीरही कोरोना उपचाराच्या यादीतून होणार बाद होण्याच्या वाटेवर
 Remdesivir injection for corona treatment will be on the way to out 

नवी दिल्ली : प्लाझ्मा थेरपी Plasma therapy कोरोना Corona रुग्णावर केल्या जाणाऱ्या उपचारपद्धतीला केंद्र सरकारने Central government करोना उपचाराच्या यादीतून वगळून टाकले.  प्लाझ्मा थेरपीबरोबरच आता सर्वात जास्त मागणी होत असलेले आणि त्यासाठी काळाबाजार कारण्यापर्यंत मजल गेलेलं रेमडेसिवीर इंजेक्शनही Remdesivir Injection करोना उपचाराच्या यादीतून वगळण्याची दाट शक्यता आहे. Remdisivir may be removed from Corona Patients Treatment

दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. डी.एस. राणा यांनी याविषयीचे काही संकेत दिले आहेत. कोरोना रुग्णांवर रेमडेसिवीर वापरामुळे चांगले परिणाम होत आहेत असे, कोणतेही पुरावे नसल्याचे या डॉक्टरांनी सांगतले आहे. त्यामुळे हे इंजेक्शन लवकरच यादीतून वगळले जाण्याचे सुतोवाच दिले जात आहेत.

डॉ. राणा यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी ही अशी माहिती दिली. डॉ. राणा यावेळी म्हणाले, “प्लाझ्मा थेरपीमध्ये आपण कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णाला करोनातून बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरातील अँटीबॉडीज Antibodies डॉक्टर देतात जेणेकरून त्या अँण्टीबॉडीज कोरोना विषाणूला संपवतील. करोनाचा संसर्ग झाल्यानंतर शरीरात अँटीबॉडीज तयार होत असतात. मात्र, या प्लाझ्मा थेरपीत रुग्णाला प्लाझ्मा दिल्यामुळे रुग्णाच्या तब्येतीमध्ये कोणताही प्रकारची सुधारणा होत नसल्याचे दिसून आले. Remdisivir may be removed from Corona Patients Treatment

ते पुढे म्हणाले, "मागच्या एका वर्षापासून आम्ही हे बघत आलेलो आहोत. त्याचबरोबर प्लाझ्मा सहजपणे उपलब्ध सुद्धा होत नाही आहे. प्लाझ्मा थेरपी वैज्ञानिक आधारावर सुरू करण्यात आली होती, मात्र पुराव्याआधारे ती थाबंवण्यात आली आहे,” अशी माहिती डॉ. राणा यांनी दिली.

“करोना रुग्णांवर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या इतर औषधांविषयी सांगायचे झाल्यास,  रेमडेसिवीर कोरोना रुग्णावर काही सकारात्मक Positive परिणाम करत असल्याचे कोणतेही पुरावे अद्याप आढळून आले नाहीत. रेमडेसिवीर इंजेक्शन कोणत्याही प्रकारे परिणाम करत नाही. त्यामुळे ते उपचाराच्या यादीतून वगळून टाकायला हवे, असेही डाॅराणा म्हणाले. Remdisivir may be removed from Corona Patients Treatment

''प्लाझ्मा थेरपी असो की रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रायोगिक औषधी लवकरच औषधी यादीतून वगळल्या जाऊ शकतात. कारण त्यांच्या वापरामुळे कोरोना रुग्णावर कोणताही चांगला परिणाम पाह्यला मिळालेला नाही. आणि पुरावे हि नाहीत. सध्या तीनच औषधी परिणामकारक ठरत आहेत. आणि सध्या यावर आम्ही परीक्षण करत आहोत” असं डॉ. राणा म्हणाले.

Edited By- Sanika Gade
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com