कमी झोपेमुळे हृदयविकाराच्या धोक्यात 24 टक्क्यांनी वाढ

कमी झोपेमुळे हृदयविकाराच्या धोक्यात 24 टक्क्यांनी वाढ
निद्रनाश.jpg

झोपेची कमतरता ही एक गंभीर समस्या बनली आहे. झोप कमी हा  उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यासारख्या आजारांशी थेट संबंधित आहे. कमी झोपमेमुळे  अनेकदा लोकांमध्ये अस्वस्थता आणि नैराश्याची तक्रारी वाढल्याचे दिसत आहे. चिंताजनक बाब म्हणजे एक तास जारी कमी झोप झाली तरी त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. (Sleep deprivation increases the risk of heart attack by 24 percent) 

एल्सेव्हियर या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ज्या लोकांना पुरेशी झोप येत नाही अशा लोकांमध्ये आत्महत्या करणारे विचार अधिक प्रमाणात आढळतात. अशा लोकांमध्ये आत्महत्येचे प्रमाणही जास्त असल्याचे दिसून आले आहे.  जर आपल्याला दररोज 7-8 तास झोप न लागल्यास आरोग्यासाठी अनेक प्रकारचे धोके वाढू  लागतात. 

- हृदय: जर झोप 1 तासापेक्षा कमी असेल तर हृदयविकारांचा धोका वाढतो 
जर एखाद्या व्यक्तीने झोपेसाठी निर्धारित वेळेपेक्षा एक तास कमी झोप घेतली असेल तर दुसर्‍या दिवशी त्याचा  हृदयविकाराचा झटका 24 टक्क्यांनी वाढतो. ओपन हार्ट या जर्नलनुसार, हृदयविकाराच्या आजारावर उपचार करण्यासाठी रुग्णालयात  दाखल झालेल्या 42000  हून अधिक लोकांवर हा अभ्यास करण्यात आला आहे.

- वय:  4 तास झोप घेत असाल तर लवकर म्हातारपण येते.
जामा या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या एका संशोधनानुसार,  केवळ 4 तास झोप घेतल्याने  अशा व्यक्तीच्या शरीरात  दहा वर्षांपेक्षा मोठे वयासारखे टेस्टोस्टेरॉन हार्मोनची वाढ होऊ लागते.  म्हणजेच हार्मोन्समुळे आधारावर तो 10 वर्षे वृद्ध दिसू लागतो.  म्हणजेच  कमी झोपेमुळे वृद्धत्व वाढते.

- प्रतिपिंडे: 50% कमी उत्पादन
स्लीप हेल्थ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, लस घेण्यापूर्वी एखाद्यास आठवडाभर पुरेशी झोप न घेतल्यास,  लसीकरणानंतर त्या  व्यक्तीच्या शरीरात केवळ 50 टक्के अॅंटीबॉडी तयार होतात. कोविड लसीवर त्याचा काय परिणाम होतो याचा अभ्यास चालू आहे.

- मेंदूः 6 तासांपेक्षा कमी झोपेमुळे अल्झायमर कहा धोका वाढतो 
सेंटर फॉर ह्युमन स्लीप सायन्सच्या मते, ज्या लोकांना निद्रानाश आणि स्लीप एपनिया आहे ज्याला दररोज 6 तास किंवा त्यापेक्षा कमी झोप येते त्यांना अल्झायमर रोगाचा धोका जास्त असतो. 

- रोग प्रतिकारशक्ती: फ्लूचा धोका तीन पटीने वाढतो
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, ज्या व्यक्तीला दररोज सात तासांपेक्षा कमी झोप येते त्या व्यक्तीला सर्दी होण्याची शक्यता 3 पट जास्त असते. तथापि, कोविडच्या बाबतीत कमी झोप कशी धोकादायक असू शकते याचे संशोधन त्याच्या सुरुवातीच्या अवस्थेत आहे. 

Edithed By - Anuradha Dhawade 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com