कोरोनाची उत्पत्ती शोधण्यासाठी अमेरिकेच्या अध्यक्षांनी लावले गुप्तहेर!

कोरोनाची उत्पत्ती शोधण्यासाठी अमेरिकेच्या अध्यक्षांनी लावले गुप्तहेर!
joe Biden 1.jpg

वॉशिंग्टन : गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना व्हायरसशी CoronaVirus लढा देत आहे. मात्र आजपर्यंत कोरोनाव्हायरसची उत्त्पत्ती कशी झाली, तो कुठून आणि कसा फैलावला गेला, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आली नाही. चीनमध्ये China  कोरोना व्हायरसचा फैलाव झाला, याबाबत मोठ्या चर्चा आतापर्यंत झाल्या आहेत. मात्र चीनने अनेकदा हा दावा फेटाळून लावला आहे.  त्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन US President Joe Biden  यांनी त्यांच्या गुप्तचर संघटनांना कोरोना व्हायरसची उत्त्पत्ती कशी  झाली, याबाबत 90 दिवसांत रिपोर्ट देण्याचे आदेश दिले आहेत. (The U.S. president spied on the origin of the corona ) 

कोरोनाव्हायरसच्या उत्त्पत्तीवर (Coronavirus Origin Theory) अमेरिकेच्या गुप्तचर संघटनाही कोणत्याच निष्कर्षावर पोहचल्या नाहीत.  कोरोनाव्हायरस  हा विषाणू प्राण्यांपासून मनुष्यात आला आहे किंवा प्रयोगशाळेत तयार झाला, याबाबत कोणताही ठोस पुरावा हाती आलेला नाही. कोरोनाच्या उत्पत्तीबद्दल जो बायडेन यांनी निवेदन जारी केले आहे.  अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी आपल्या गुप्तचर संघटनेला याबाबत ठोस निष्कर्ष काढण्यासाठी आणि याबाबत अहवाल सादर  करण्यासाठी आणखी 90 दिवसांचा कालावधी दिला आहे. 90 दिवसांत गुप्तचर समुदायाला आपला अहवाल सादर करावा लागणार आहे.

तथापि, अमेरिकन इंटेलिजेंस कम्युनिटीच्या एका समूहाचे म्हणणे आहे की, कोरोना व्हायरस प्राण्यांमधून मनुष्यात आला आहे. तर दुसऱ्या समूहाचे म्हणणे आहे की, कोरोना व्हायरस अपघाताने वूहानच्या लॅबमध्ये तयार झाला आहे. म्हणजेच मनुष्याने हा विषाणू प्रयोगशाळेत तयार केला असून तो चुकीने पसरला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

अमेरिकी इंटेलिजन्स समुदायाच्या दोन्ही गटांमध्ये संभ्रम असल्यामुळे आणि  कोरोना विषाणूची उत्पत्ती कशी झाली,  याबाबत कोणताही ठोस पुरावा नसल्यामुळे आताच काहीही सांगता येणार नाही, असे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांच्यासारखे विचार असणाऱ्या देशांसोबत काम करत राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान आतापर्यंत अनेक देशांनी चीनच्या वूहान लॅबमध्ये कोरोना व्हायरसची उत्पत्ती केली असल्याचा आरोप केला आहे. मात्र चीनने वेळोवेळी हा आरोप फेटाळून लावला आहे. 

Edited By - Anuradha Dhawade 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com