केळगाव वनविभागाला लागली आग;हजारो वृक्ष आगीत जळून खाक

दीपक क्षीरसागर 
शुक्रवार, 26 मार्च 2021

जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील केळगाव वन विभागाच्या वन क्षेत्रांमध्ये अचानक लागलेल्या आगीमुळे 15 हेक्टर क्षेत्र आगीत जळून खाक झाले आहे. त्यामध्ये वन विभागाने वृक्ष लागवड केलेली हजारो झाडे आगीत जळून खाक झाली आहेत

लातूर : जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील केळगाव वन विभागाच्या वन क्षेत्रांमध्ये अचानक लागलेल्या आगीमुळे 15 हेक्टर क्षेत्र आगीत जळून खाक झाले आहे. त्यामध्ये वन विभागाने वृक्ष लागवड केलेली हजारो झाडे आगीत जळून खाक झाली आहेत. (Forest Fire in Kelgaon Section Thousands of Trees Burnt)

केळगाव येथे 53 हेक्टर क्षेत्र वन विभागाच्या (Forest) ताब्यात आहे. त्यात सर्वे नंबर 99 क या वन विभागाच्या क्षेत्रात सन 2019-20 या वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली होती.  पण अचानक लागलेल्या आगीमध्ये (Fire) अनेक झाडे आगीत जळून खाक झाली आहेत . वन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे ही मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये शासनाचे लाखो रुपये खर्च करून 2 कोटी वृक्ष लागवडी या कार्यक्रमाच्या अंतर्गत वृक्षलागवड करण्यात आली होती. 

परंतु आज लागलेल्या अचानक आगीमध्ये त्यातली हजारो झाडे हे जागीच जळून त्याची राख झाली आहे.आग विझवण्याचे केविलवाणे प्रयत्न हे वन विभागाकडून सुरू होते, मात्र आग आटोक्यात आली नव्हती.एकंदरीत पाहता आगीत हजारो झाडे,झुडुपे जळून गेल्याने शासनाचा लाखो रुपयांचा फटका बसला आहे. आगीच्या लोळाने हरीण,मोर, रानडुक्कर असे वन्य प्राणी हे वन सोडून जीव वाचवण्यासाठी जंगलातून पळ काढून निघून गेल्याचे स्थानिक शेतकरी सांगत आहेत.

Edited By - Digambar Jadhav
 


संबंधित बातम्या

Saam TV Live