भारताचे माजी अ‍ॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांचे  करोनामुळे निधन

साम टिव्ही ब्युरो
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

भारताचे माजी अ‍ॅटर्नी जनरल आणि प्रख्यात न्यायाधीश सोली जहांगीर सोराबजी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.आज सकाळी त्यांचे निधन झाले. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरमायन त्यांचे निधन झाले आहे.

 

भारताचे माजी अ‍ॅटर्नी जनरल Former Attorney General आणि प्रख्यात न्यायाधीश Judge सोली जहांगीर सोराबजी Soli Sorabjee यांचे निधन Death झाले आहे. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी त्यांचे निधन झाले. कोरोनाची Corona लागण झाल्यानंतर त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात Hospital  उपचार सुरू होते. मात्र उपचारादरमायन त्यांचे निधन झाले आहे. दक्षिण दिल्लीमधील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते अशी माहिती कुटुंबातील सूत्रांनी दिली आहे. Former Attorney General of India Soli Sorabjee dies due to corona

 

सोली सोराबजी यांनी १९५३ मध्ये त्यांनी बॉम्बे हाय कोर्टमध्ये वकिली क्षेत्रातील कारकिर्दीला सुरवात केली होती. १९७१मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. १९८९-९० मध्ये त्यांची देशाचे अॅटर्नी जनरल म्हणूनन नियुक्ती करण्यात आली. १९९८ ते २००४ मध्येही त्यांनी अॅटर्नी जनरल म्हणून काम पाहिले होते. १९९७ मध्ये नायजेरियासाठी सोराबजी यांची संयुक्त राष्ट्रसंघाचे विशेष प्रतिनिधी म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती.

Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live