अकोल्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तात्काळ सुरू करा, माजी गृहराज्यमंत्र्याची मागणी

जयेश गावंडे
बुधवार, 21 एप्रिल 2021

गेल्या कित्येक दिवसापासून तयार असलेले अध्यावत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नॉन कोविड रुग्णासाठी तात्काळ सुरू करावे अशी मागणी माजी गृह राज्यमंत्री आमदार डॉ. रणजित पाटील यांनी केली आहे. आज त्यांनी प्रशासनासोबत बैठक घेतली. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी साम टिव्हीने याबद्दल बातमी दाखवली होती.  

अकोला: कोरोनाचा वाढता संसर्ग सर्वत्र हाहाकार माजवत आहे. गेल्या कित्येक दिवसापासून तयार असलेले अध्यावत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल Super Specialty Hospital, नॉन कोविड Non Covid रुग्णासाठी तात्काळ सुरू करावे अशी मागणी माजी गृहराज्यमंत्री आमदार डॉ. रणजित पाटील Ranjit Patil यांनी केली आहे. आज त्यांनी प्रशासनासोबत बैठक घेतली. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी साम टिव्हीने Saam TV याबद्दल बातमी दाखवली होती.  Former Home Minister demands immediate start of Super Specialty Hospital in Akola

अकोला, बुलढाणा, वाशीम या जिल्हयातून येणाऱ्या रुग्णांसाठी अकोल्यात रुग्णालय सुरू करावे. अशी मागणी गेल्या एक वर्षांपासून राज्य सरकारकडे वारंवार  करण्यात आली. परंतु कुठलाही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. आज कोविड १९ रुग्णांसोबतच दुर्धर आजारांनी ग्रस्त नागरिकांना औषधाउपाचार साठी मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. 

कोविड रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून अश्या आणीबाणीच्या काळात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तात्काळ सुरू करण्याची मागणी माजी राज्यमंत्री आमदार डॉ रणजित पाटील यांनी राज्य सरकार तसेच मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता गजभीये यांच्याकडे केली आहे.  ते मेडिकल कॉलेज मधील समस्या आणि नियोजन संबंधी आढावा बैठकीमध्ये बोलत होते.

त्यांनी कोरोनाच्या वॉर्डामध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन रुग्णांची विचारपूस केली, तसेच व्हेंटिलेटरची सुविधा, आयसीयू वॉर्ड, ऑक्सिजन प्लांटची पाहणी, रुग्णालयातील रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्धता, रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांसाठी व्हिडीओ कॉन्फरसिंगची सुविधा उपलब्ध करणे, रुग्णाच्या नातेवाईकांसाठी कौन्सिलिंगची सुविधा करणे इत्यादी  बाबीवर चर्चा करून प्रशासनाला योग्य निर्देश दिले, तसेच  रुग्णांची अविरत सेवा करणारे ९० पेक्षा जास्त डॉक्टर्स आणि इतर स्टाफ यांचे त्यांनी कौतुक करून त्यांचे कार्याबद्दल समाधान व्यक्त करीत त्यांचे अभिनंदन केले. 

यावेळी डॉ सुमंत घोरपडे, डॉ अष्टपुत्रे, डॉ सिरसाम, डॉ नेताम, भाजपा नेते डॉ अशोक ओळंबे, नगरसेवक हरीश अलीमचंदानी, अभ्यागता समिती सदस्य दीपक मायी, अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश पदाधिकारी हाजी चांदखा, भाजपा जिल्हासदस्य संजय चौधरी, नगरसेवक आशिष पवित्रकार, सचिन पाटील, आशिष शर्मा,जमिरखान, भवानी प्रताप यांची उपस्थिती होती.

Edited By- Sanika Gade
 

 

संबंधित बातम्या

Saam TV Live