अनिल गोटे म्हणतात...मोदी ऐशोआरामी शहेनशहा!

भूषण अहिरे
मंगळवार, 11 मे 2021

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. देशातील सर्वात मोठे "ऐशोआरामी शहेनशहा" म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत "फकीर फकीर" म्हणत देशातील सर्वश्रेष्ठ ऐशोआराम भोगणारे पहिले पंतप्रधान म्हणत नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली आहे.

धुळे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे NCP ज्येष्ठ नेते तथा धुळ्याचे Dhule माजी आमदार अनिल गोटे Anil Gote यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांच्यावर निशाणा साधला आहे. देशातील सर्वात मोठे "ऐशोआरामी शहेनशहा" म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत "फकीर फकीर" म्हणत देशातील सर्वश्रेष्ठ ऐशोआराम भोगणारे पहिले पंतप्रधान म्हणत नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली आहे. Former MLA Anil Gote has targeted the Prime Minister in a circular

गोटे यांनी यासंदर्भातील पत्रक Circular सोशल मीडिया वरती व्हायरल केले आहे. या परिपत्रकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दीड वर्षांमध्ये तब्बल ३३ हजार कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याचा आरोप परिपत्रकातून केला आहे. दिल्लीत नवे पंतप्रधान निवास बांधण्याची योजना आहे. त्यावर विरोधी पक्ष टीकेची झोड उठवत आहेत. 

एवढ्या पैशांमध्ये देशातील प्रत्येक जिल्ह्याचा स्वतःचा ऑक्सीजन प्लांट Oxygen Plant उभारता आला असता. तसेच 100 बेड्स चे व्हेंटिलेटर असलेले किमान साडेचारशे हॉस्पिटल्स गरिबांसाठी उभारता आले असते. असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या खर्चावर गोटे यांनी निशाणा साधला आहे.

कोरोनावर मात करुन घरी जाताना दिला जातोय आॅक्सिजन प्लँट

तसेच कोरोनाच्या Corona या संकट काळामध्ये पंतप्रधानांचा ऐशोआरामाचा खर्च महत्त्वाचा की, राष्ट्राची आवश्यक असलेली प्राथमिकता ? यामध्ये कुठल्या गोष्टीला महत्त्व देणं गरजेच होतं हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षात आले नाही. यामुळेच संपूर्ण देशामध्ये कोरोणाचा उद्रेक वाढला असल्याचा आरोप देखील यावेळी गोटे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लावला आहे.

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live