माजी आमदार धोंडे यांनी एक महिन्याचे पेंशन केले कोविड रुग्णांना सुपूर्द  

विनोद जिरे
गुरुवार, 29 एप्रिल 2021

भाजपचे माजी आमदार भीमसेन धोंडे यांनी आपले एक महिन्याचे पेंशन कोविड रुग्णांसाठी सुपूर्द केले आहेत. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याकडे धोंडे यांनी आपले पेन्शन दिले.

बीड : बीडच्या आष्टी Ashti येथील भाजपचे BJP माजी आमदार भीमसेन धोंडे Bhimsen Dhonde यांनी आपले एक महिन्याचे पेंशन Pension कोविड Covid रुग्णांसाठी सुपूर्द केले आहेत. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याकडे धोंडे यांनी आपले पेन्शन दिले आहे. राज्यातील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी देखील आपला दोन दिवसांचा पगार कोविड निर्मूलनासाठी द्यावा असे आवाहन धोंडे यांनी केले आहे. Former MLA Dhonde handed over one month pension to Covid patients

या दरम्यान धोंडे यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकार State Government केंद्रावर अवलंबून राहिले. राज्याने स्वतःच्या निधीतून काहीच केलेले नाही. लस Vaccine खरेदी करू असं ठराव घेतला. परंतु  त्यांनी हे चार महिन्यांपूर्वी केलं असतं तर इतके रुग्ण मृत्युमुखी पडले नसते अशी सडकून टीका धोंडे यांनी केली आहे.

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live