माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचे सचिव राम खांडेकर यांचे निधन 

ram khandekar.jpg
ram khandekar.jpg

वृत्तसंस्था : माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव Former PM P. V. Narasimha Rao याचे सचिव Secretary म्हणून काम करणाऱ्या राम खांडेकर Ram Khandekar यांचे  काल (8 जून) दीर्घ आजाराने नागपुरात  निधन झाले. ते 87 वर्षांचे होते.  त्यांच्या पश्चात मुलगा, सून आणि दोन नातवंडे असा परिवार आहे. नरसिंह राव यांनी राम खांडेकर यांना 1985 मध्ये नागपुरातील त्यांच्या तत्कालीन रामटेक मतदारसंघातील Ramtek constituency  कामकाज  सांभाळण्यासाठी आमंत्रित केले होते.  (Former Prime Minister Narasimha Rao's Secretary Ram Khandekar passes away) 

1991 मध्ये जेव्हा नरसिंहराव पंतप्रधान झाले तेव्हा खांडेकर यांनी त्यांचे स्पेशल ड्युटी-ओएसडी ऑफिसर म्हणून काम पाहिले. राम खांडेकर हे राव यांचे निकटचे विश्वासू मानले जात होते आणि मृत्यूपर्यंत त्यांनी त्यांच्याबरोबर काम केले. यासह त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वाय. बी.  चव्हाण यांचे खाजगी सचिव म्हणूनही काम केले. राम खांडेकर अनेकदा वेगवेगळ्या मराठी वृत्तपत्रांसाठी त्यांच्या सेवेच्या लांबीवर आणि राजकीय नेत्यांशी केलेल्या संवादावर आधारित लेखही लिहिले आहेत.   

यशवंतराव चव्हाण आणि नरसिंहराव यांच्यासारख्या बड्या नेत्यांचे खाजगी सेक्रेटरी म्हणून त्यांनी तीन दशकांहून अधिक काळ सरकारी सेवेत घालवली. या काळात त्यांनी सत्तेतील अनेक बदल अगद जवळून पहिले. मात्र  आपल्या प्रामाणिकपणाच्या जोरावर खांडेकरांनी यशवंतराव आणि नरसिंहराव यांचा विश्वास जिंकला होता. राजकीय नेतृत्त्व आणि सेवा याव्यतिरिक्त त्यांनी दिवाळी अंकासाठी आपल्या कारकिर्दीत 60 ते 70 लेख लिहिले. 2018 मध्ये त्यांनी आपल्या पाच दशकांहून अधिक काळातील प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर त्यांनी एका वृत्तपत्रात एक साप्ताहिक कॉलम लिहिले.  तर 2019 मध्ये राजहंस पब्लिकेशन ने हेच लेख 'सत्तेच्य पदछाये' नावाच्या पुस्तकात प्रकाशित केले. 

Edited By- Anuradha Dhawade 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com