शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचा सरकारला घरचा आहेर

भारत नागणे
बुधवार, 12 मे 2021

 शिवसेनेचे माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी आज प्रशासनावर गंभीर आरोप करत सरकारला घरचा आहेर दिला आहे . मुख्यमंत्र्यांच्या राज्यातील ब्रेक द चेन ला राज्यातील प्रशासन अधिकारी मोडत तोडत असल्याने राज्यात कोरोना वाढत आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास राज्यातील  प्रशासन कमी पडत असून सगळीकडे सावळा गोंधळ सुरू असल्याचा आरोपही आमदार सावंत यांनी केला

पंढरपूर - शिवसेनेचे Shivsena माजी मंत्री आमदार तानाजी सावंत Tanaji Sawant यांनी आज प्रशासनावर गंभीर आरोप करत सरकारला घरचा आहेर दिला आहे . मुख्यमंत्र्यांच्या राज्यातील ब्रेक द चेन ला राज्यातील प्रशासन अधिकारी मोडत तोडत असल्याने राज्यात कोरोना corona वाढत आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास राज्यातील  प्रशासन कमी पडत  असून सगळीकडे सावळा गोंधळ सुरू असल्याचा आरोपही Allegations आमदार सावंत यांनी केला. Former Shiv Sena minister Tanaji Sawant's on state government

हे देखील पहा -

शिवसेनेचे माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांची नुकतीच सोलापूर Solapur  जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख पदी नियुक्ती झाली आहे. आज पंढरपुरात येऊन त्यांनी बैठक घेऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला या वेळी ते बोलत होते.

जम्बो कोविड सेंटरमधून मौल्यवान वस्तू चोरीला

 मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी ब्रेक दी चेन ही मोहीम राबवली आहे.प ण तहसीलदार , पोलिस अधिकारी अशांची जबाबदारी आहे ते लोक सगळे कागदावरच राबवत आहेत. अनेक कोरोना रुग्ण बाहेर फिरत असल्याने संसर्ग वाढत आहे. असा गंभीर आरोप आमदार तानाजी सावंत यांनी केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

 

संबंधित बातम्या

Saam TV Live