राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांना अटक

रोहिदास गाडगे
बुधवार, 26 मे 2021

आठवड्यात दुसरा गुन्हा दाखल

शिरुर: पुणे जिल्ह्यातील (Pune District) राजकारणातील प्रसिद्ध नेते व राष्ट्रवादी कॉग्रेसचे (NCP) माजी प्रदेश उपाध्यक्ष आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती मंगलदास बांदल यांच्यावर आठ दिवसांत फसवणुकीचा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.  आज शिक्रापुर पोलीसांनी अटक केल्याने शिरुर तालुक्यातील राजकारण चर्चेला उधाण आले आहे. मंगलदास बांदल यांच्यावर मागील आठवड्यात सेवानिवृत्त पोलीसांच्या शेतातील विहिरीतुन पाणीचोरी प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा शिक्रापुर पोलीसांत दाखल करण्यात आला होता.(Former state vice president of NCP Mangaldas Bandal arrested)  

हे देखील पाहा

तेव्हापासुन बांदल फरार होते या गुन्ह्यात त्यांना अटकपुर्ण जामिन मंजुर झाला होता.  त्याच दरम्यान दत्तात्रेय रावसाहेब मांढरे यांच्या फिर्यादीवरुन त्यांचे जमिन क्षेत्र व दोन व्यापारी गाळे यांचे कुलमुखत्यारपत्र तयार करुन त्या जमिनीवर पुण्यातील सहकारी बँकेतुन परस्पर आठ लाखांचे कर्ज काढुन फसवणुक केल्याची तक्रार मांढरे यांनी आज शिक्रापुर पोलीसांत केली. त्यांच्या फिर्यादीवरून मंगलदास बांदल यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच आठवड्यात दुसरा गुन्हा नोंद झाल्यानंतर शिक्रापुर पोलीसांनी गुन्हा दाखलबाबत आज दिवसभर गोपनीयता बाळगली होती.  याच दरम्यान बांदल आज मागील गुन्ह्यातील अटकपुर्व जामीन झाल्याची कागदपत्र सादर करण्यासाठी शिक्रापुर पोलीसांत गेल्यानंतर शिक्रापुर पोलीसांनी मंगलदास बांदल यांना अटक केली असल्याची माहिती पोलीस निरिक्षक हेमंत शेडगे यांनी दिली आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live