VIDEO| हवेत उडाली फॉर्च्यूनर कार !

ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही
गुरुवार, 16 जानेवारी 2020

सकाळची वेळ होती.रस्त्यावर शुकशुकाट असल्याने फॉर्च्यूनर कार वेगानं चालली होती.पण, वळणावर मात्र, ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं आणि हवेत ही भलीमोठी कार उडाली.
किती भयानक अपघात घडलाय पाहा. चित्रपटातील सीनपेक्षा खतरनाक अपघात झालाय. आता बघा, ही फॉर्च्यूनर कार वेगानं चालली होती...इतका वेग होता की वळणावर ड्रायव्हरला कार वळवायलाच जमली नाही.आणि ही कार थेट हवेत उडाली आणि भिंत ओलांडून दोन गाड्यांवर जाऊन आदळली.

ही धक्कादायक घटना चंदीगडच्या सेक्टर-37 मध्ये घडलीय.अपघात झाला त्यावेळी दुसऱ्या बाजूनंही एक कार येत होती.पण, या ड्रायव्हरचं नशीब बलवत्तर म्हणून अजून मोठा अपघात होता होता वाचला.आता बघा, ही कार जोरात धडकली त्याचवेळी मागून एक कार गेली.थोडासा जरी उशीर झाला असता तर ही कारही या कारला आदळली असती.या अपघातात हवेत उडालेल्या कारच्या ड्रायव्हरला गंभीर दुखापत झालीय...हा अपघात सीसीटीव्हीत कैद झालाय.

अचानक झालेल्या या अपघातामुळे एकच गोंधळ उडाला.लोकांनी धाव घेऊन गाड्यांवर आदळलेल्या फॉर्च्यूनर कारला सरळ केलं.त्यानंतर ड्रायव्हरला खाली उतरवलं.कारचा ड्रायव्हर रजिंदर सिंह यांचं मानसिक संतुलन ठीक नव्हतं.त्यामुळं अपघात झाल्याची कबुली त्यानं दिलीय.ड्रायव्हर खोटं बोलत असेल म्हणून त्याची वैद्यकीय चाचणी केली.पण, त्याच्या रक्तात अल्कोहोलचं प्रमाणही आढळून आलं नाही.ड्रायव्हरवर उपचार सुरू असून, दुसऱ्या कारचं नुकसान झाल्याची तक्रारही त्याच्याविरोधात करण्यात आलीय.

संबंधित बातम्या

Saam TV Live