पश्चिम बंगालच्या निवडणुकीत गुन्हेगारीचा 'खेला होबे'

Crime
Crime

कोलकत्ता : पश्‍चिम बंगालच्या रमधुमाळीत 'खेला होबे' ची घोषणा गाजत असली तरी पहिल्या टप्प्यातील उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्‍वभूमीवर नजर टाकली तर निवडणुकीच्या नमनाला गुन्हेगारीचाही 'खेला होबे' झालाय की काय, असे वातावरण दिसते. कारण पहिल्याच टप्प्यात निवडणुकीच्या फडातील 191 उमेदवारांपैकी गंभीर व अतीगंभीर गुन्हे दाखल असलेल्या सर्वपक्षीयांची संख्या 90 (47 टक्के) इतकी आहे. (Forty Percent Criminals in fray for West Bengal First Phase Election)

लोकशाही सुधारणांबाबतची एडीआर संस्था व बंगाल निवडणूक वॉच (West Bengal) च्या वतीने केलेल्या या अभ्यास पाहणीत या टप्प्यातील उमेदवारांपैकी 48 जणांवर गंभीर व 42 जणांवर अतीगंभीर गुन्हे (Crime) दाखल असल्याची कबुली त्यांनीच निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे.

गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांत माकपच्या 18 पैकी 10 (56 टक्के), भाजपच्या (BJP) 29 पैकी 12 (41), तृणमूल कॉंग्रेसच्या (TMC) 29 पैकी 10 (35) व कॉंग्रेसच्या 6 पैकी 2(33%) उमेदवारांचा समावेश आहे. अतीगंभीर गुन्हे दाखल झालेल्यांत माकपच्या 9 (50%) , भाजपच्या 8(28%), तृणमूलच्या व कॉंग्रेसच्या (Indian National Congress) प्रत्येकी एकेका उमेदवारांचा (17% व 9%)) समावेश आहे. बसपाचे 2 उमेदवारही यात आहेत. याशिवाय महिलांच्या बाबतीतले बलत्कार, अपहरण,आदी गुन्हे नोंद असणाऱ्या उमेदवारांची संख्या या टप्प्यात 12 आहे. खून व खुनाचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या 27 इतकी आहे. (Forty Percent Criminals in fray for West Bengal First Phase Election)

सर्वपक्षांनीच गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या 25 टक्के उमेदवारांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातल्याने याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षी 13 फेब्रुवारीला राजकारणातील गुन्हेगारी घटविण्याबाबत केलेल्या निर्देशांचा फारसा परिणाम न झाल्याचेही उघड आहे. मुख्य पक्षांचे 33 ते 56 टक्के उमेदवार गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे आहेत. या टप्प्यात संवेदनशील म्हणजे रेड अलर्ट जाहीर झालेले 7 (23 टक्के) मतदारसंघ आहेत.

पहिल्या टप्प्यातील अन्य ठळक नोंदी
5 वी ते 12 वी पास उमेदवार - 96(50%)
पदवीधर व त्यापुढील -92 (48%)
पदविकाधारक -3
25 ते 40 वयोगटातील 53(28%)
60 वर्षांपर्यंतचे 109 (57%)
61 ते 80 वयोगटातील - 29(15%)
कोट्यधीश - 19(10%) (तृणमूलचे सर्वाधिक 4)
Edited By - Amit Golwalkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com