धक्कादायक - सोलापूरात 43 प्रशिक्षणार्थी पोलीसांना कोरोनाची बाधा

विश्वभूषण लिमये
रविवार, 28 मार्च 2021

सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात कोरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या 33 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची(corona) बाधा झाली आहे.यामध्ये जवळपास 24 डॉक्टर तर 9 आरोग्य कर्मचारी आहेत.

सोलापूरसोलापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ चाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आपला जीव मुठीत घेऊन रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. (Forty Three Police Personnel Found Corona Positive in Solapur)

सोलापूरच्या (Solapur) शासकीय रुग्णालयात कोरोना (Corona) बाधितांवर उपचार करणाऱ्या 33 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची(corona) बाधा झाली आहे.यामध्ये जवळपास 24 डॉक्टर तर 9 आरोग्य कर्मचारी आहेत.

हे देखिल वाचा - प्रणिती शिंदेंच्या त्या विधानावरुन खळबळ

शासकीय रुग्णालयात उपचारासाठी कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्याच पद्धतीने नॉन कोविड रुग्णांची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर आधीच ताण वाढलेला आहे.रुग्णालयात वाढणारी गर्दी आणि रुग्णांची संख्या यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची बाधा होत आहे. दुसरीकडे सोलापूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणासाठी आलेल्या पोलीस (Police) प्रशिक्षणार्थींना देखील कोरोनाची लागण झाली आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 43 प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. (Forty Three Police Personnel Found Corona Positive in Solapur)

हे सर्व प्रशिक्षणार्थी 15 दिवसांच्या प्रशिक्षणासाठी सोलापुरात आले होते.यातील काही जणांना त्रास जाणवल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. सुरुवातीला 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना रुग्णालयात अॅडमिट करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहे.काही जणांचे अहवाल हे ट्रेनिंग संपल्यानंतर आल्याने त्यांना त्यांच्या मूळ जिल्ह्यात पाठवण्यात आले आहे.तिथेच त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य संजय लाटकर यांनी दिली आहे.

Edited By - Digambar Jadhav 


संबंधित बातम्या

Saam TV Live