भयानक : नगरमध्ये 42 मृतदेहांवर एका पाठोपाठ अंत्यसंस्कार 

साम टीव्ही ब्युरो
शुक्रवार, 9 एप्रिल 2021

ज्याप्रमाणे कोरोनाबधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याप्रमाणे आता कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. काल अहमदनगर मध्ये एकाच दिवशी 42 रुग्णांचा मृत्यू झाले

नगर : नगर Ahmednagar जिल्ह्यात कोरोना Corona चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ज्याप्रमाणे कोरोनाबधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याप्रमाणे आता कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. काल नगर मध्ये एकाच दिवशी 42 रुग्णांचा मृत्यू झाले. या सर्व रुग्णांवर अहमदनगरच्या अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. सर्व मृतदेह एकापाठोपाठ एक जळत होते. मात्र हे दृश्य मन सुन्न करणारे होते. Forty Two Dead Bodies Cremated at Nagar in One night

नगर जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहरच केला. नगर जिल्ह्यात काल एकाच दिवसात २२३३ रुग्ण कोरोना बाधित झाल्याची उच्चांकी नोंद करण्यात आली आहे, तर तब्बल 42 रुग्णांचा मृत्यू झाले आहे.

या सर्व रुग्णांवर नगरच्या अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले असून, अमरधाम येथे असलेल्या विद्युत दाहिनीत 20 रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. उर्वरित 22 रुग्णांचे मृतदेह लाकडी सरणावर ठेऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. Forty Two Dead Bodies Cremated at Nagar in One night

एकापाठोपाठ एक मृतदेह हे रात्री अमरधाम येथे जळत होते. हे दृश्य पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कोरोनावर निर्बंध आणण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून अनेक उपायोजना करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असून नागरिकांनी सांगितलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन महानगरपालिका आयुक्तांनी केले आहे. अहमदनगर शहरात अमरधाम मध्ये दोन विद्युत दाहिनी आहेत. यामध्ये आणखीन एक विद्युत दाहिनी बसवावी, अशी नगरसेवकाची मागणी आहे.

Edited By- Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live