करोनावर औषध सापडलं? आता अमेरिकन संशोधकांचा दावा

साम टी्व्ही
शुक्रवार, 1 मे 2020
  • करोनावर औषध सापडलं?
  • अमेरिकन संशोधकांचा दावा
  • विषाणूंच्या डीएनएनएवर परिणाम करणारं औषध?

जगभरातील 180 हून अधिक देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झालाय. सारं जग कोरोनावर औषध शोधण्याचा प्रयत्न करतंय. अशातच कोरोनावर औषध सापडल्याचा दावा केला जातोय. कोणत्या देशानं हा दावा केलाय.

कोरोनाच्या विषाणूनं जगभरात हाहाकार माजवलाय. सारं जग कोरोना विषाणूचा नायनाट करण्यासाठी लस शोधतंय. अशातच अमेरिकेमधून एक सकारात्मक बातमी समोर आलीय. इथल्या संशोधकांनी रेमडेसिवीर हे औषध करोनावर परिणामकारक ठरत असल्याचा दावा केलाय. करोनावर मात करणारे औषध सापडल्याचा दावा करण्याची ही जगातील पहिलीच वेळ आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार डॉक्टर अँथोनी फॉउसी यांनी यासंदर्भात माहिती दिलीय. रेमडेसिवीर औषधांचा वापर करण्यात आलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याचं आढळून आलंय. 

21 फेब्रुवारीपासून अमेरिका, युरोप आणि आशियातील एकूण 68 ठिकाणी या औषधाची चाचणी एक हजार 63 रुग्णांवर सुरु होती. अनेक दिवसांच्या चाचणीनंतर हे औषध इतर औषधांच्या तुलनेत करोनावर अधिक प्रभावी असल्याचे समोर आलं आहे. अमेरिकेतील नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ अलर्जी अण्ड इफेक्शियस डिसीजनं रेमडेसिवीर औषध दिलेले रुग्ण हे इतर औषध देण्यात आलेल्या रुग्णांच्या तुलनेत अधिक वेगानं करोनावर मात करु शकतील असं म्हटलंय. रेमडेसिवीर देण्यात आलेले रुग्ण 11 दिवसांमध्ये तर इतर औषधांवर असणारे रुग्ण 15 दिवसांमध्ये करोनामधून बरे झाल्याचं निरिक्षक नोंदवण्यात आलंय. 
फायनल व्हीओ - हे औषध विषाणूच्या आरएनए आणि डिएनएवर परिणाम करतं. हे औषध आरएनए आणि डिएनएमध्ये शोषलं जाते आणि ते विषाणूच्या जिनोममध्ये मिसळते. त्यामुळे विषाणूचा गुणाकार होत नाही.
रेमडेसिवीरप्रमाणे काम करणारी औषधांच्या निर्मितीसंबंधात संशोधन करणं गरजेचे असल्याचे मत संशोधकांनी व्यक्त केलं आहे. रेमडेसिवीरसंदर्भात अमेरिका लवकरच ठोस निर्णय घेण्याची शक्यताही व्यक्त केली जातीय 


संबंधित बातम्या

Saam TV Live