पाकिस्तानला साडेचार कोटी कोरोना डोस गिफ्ट,भारताचा पाकिस्तानसोबत दिलदारपणा

साम टीव्ही
गुरुवार, 11 मार्च 2021

भारताचा पाकिस्तानसोबत दिलदारपणा
पाकिस्तानला साडेचार कोटी कोरोना डोस गिफ्ट
रडक्या पाकिस्तानला दिलदारपणाची भेट

भारतात तयार करण्यात आलेल्या सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीचे, साडे चार कोटी डोस पाकिस्तानला देण्यात येणार आहेत. पाकिस्तानला ही लस सप्टेंबर 2020मध्ये केलेल्या करारा अंतर्गत देण्यात येतेय.

पाकिस्तान जन्मापासून भारताच्या विरोधात कारवाया करत आलाय. युध्दखोर पाकिस्तानला रणांगणावर चारीमुंड्याचित केल्यानंतरही पाकिस्तानच्या अधूनमधून कुरघोड्या सुरुच असतातात. असा नाठाळ शेजारी असतानाही भारतानं आपला शेजारधर्म सोडलेला नाही. आता कोरोनाच्या संकटातही भारतानं आपला दिलदारपणा कायम ठेवलाय. भारत तब्बल साडे चार कोटी कोविशिल्ड लसीचे डोस पाकिस्तानला मोफत देणार आहे. त्यापैकी तब्बल १ कोटी ६० लाख डोस याच महिन्यात पाकिस्तानला देण्यात आलेत. तर उर्वरित डोस जूनपर्यंत देण्यात येणार आहेत.

 भारतात अजून लसीकरण पूर्ण झालेलं नसताना शेजाऱ्यांना लस देण्याच्या भूमिकेला विरोध होतोय.

 पाकिस्तानला लस देऊन भारतानं शेजारधर्माचं पालन केलंय. आता पाकिस्तानंनं त्या मोबदल्या दहशतवादी भारतात घुसवले नाही तर मिळवलं?.

 


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live