सांगली जिल्हयातील वाळवामध्ये सिलिंडरचा स्फोट, स्फोटाने बारबीगा परिसर हादरलं

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

वाळवा - सांगली जिल्ह्यातील वाळव्यामध्ये एका घरात आग लागली. यात घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग भडकली. वाळवा येथील बाराबीगा परिसरात ही घटना घडली झाले. स्फोटांमुळे आग पसरून 24 शेतमजुरांची राहती घरे खाक झाली. आगीत सुमारे पन्नास लाखांची हानी झाली आहे. त्यात सुमारे पाच लाखांची रोकड आणि दहा तोळे सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे.

तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली. घटनास्थळी हुतात्मा उद्योग समूहाचे नेते वैभव नायकवडी यांनी भेट दिली. नुकसान झालेल्या मजूरांना त्यांनी धीर दिला. शिवाय हुतात्मा साखर कारखान्यातर्फे प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत आणि या मजुरांना कारखान्यातर्फे दोन वेळा जेवण उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले.

यावेळी डाॅ. सुषमा नायकवडी, सरपंच डाॅ. शुभांगी माळी, तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. आगीत नुकसान झालेल्यांना शासनातर्फे सर्व ती मदत देण्यात येईल असे तहसीलदारानी सांगीतले.

वाळवा येथे बाराबीगा वसाहतीत मजूर कुटुंबे राहतात. याठिकाणी सकाळी अचानक आग लागली. त्यानंतर दहा मिनिटात एका गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्याधडाक्यात शेजारी असलेल्या घरांना आगीचा विळखा पडला. त्यानंतर पाठोपाठ तीन सिलिंडरचे स्फोट झाले. त्यात 24 घरे खाक झाली. एक म्हैस किरकोळ भाजली आहे. माळभागातील जिगरबाज तरूणानी आगीवर नियंत्रणासाठी मोठे परिश्रम घेतले. तालुका प्रशासनाने तातडीने पंचनामे केले. तर गावातील रेशन दुकानदारांनी आगीत नुकसान झालेल्या व्यक्तींना गहू, तांदूळ वाटप केले.

Web Title: Fire incidence in Walawa

संबंधित बातम्या

Saam TV Live