पुण्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल, आज ४६७ रुग्णांची नोंद

अमोल कविटकर
बुधवार, 2 जून 2021

आज पुण्यात एकुण रुग्ण ४६७ रुग्णांची  नोंद झाली आहे तर ६५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर ४३ रुग्णांचा मृत्यू  झाला आहे. राज्यात आता रोजच्या कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसून येत आहे.

पुणे - कोरोना Corona व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात थैमान घातले आहे. रोज लाखो लोकांना कोरोनाचं संक्रमण होताना दिसत आहे. अनेकांनी या व्हायरसमुळे आपले प्राण गमावले आहेत. कोरोनाने Corona शहरांसह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर थैमान घातल्याने, सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल झालं आहे. four hundred sixty seven and patients registered in Pune today

मात्र असे असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज दीड ते दोन हजार पेशंट सापडणाऱ्या पुण्या आज नव्याने सापडलेल्या रुग्णांच्या संख्येत मोठी घाट झाली आहे. पुणे शहरात आटोक्यात येत असलेल्या कोरोना ने पुन्हा डोकं वर काढलं आणि रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत गेली.  मात्र आता या रुग्ण वाढीतून पुणेकरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.

आमदार कुणाल पाटील यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

आज पुण्यात एकुण रुग्ण ४६७ रुग्णांची  नोंद झाली आहे तर ६५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर ४३ रुग्णांचा मृत्यू  झाला आहे. राज्यात आता रोजच्या कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसून येत आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या काही दिवसांपासून अधिक असल्याचे समोर येत आहे. असे असले तरी करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येतही वाढ सुरूच आहे.   four hundred sixty seven and patients registered in Pune today

पुण्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता ४ लाख ७० हजार ७७८ वर पोहचली आहे. तर आजपर्यंत ८ हजार ३१३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज ७५१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आज अखेर ४ लाख ५७ हजार १६० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर पुण्यात सध्या ५ हजार ३०५ रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर आज पुण्यात ७ हजार ४८३ नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली.

Edited By - Shivani Tichkule

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब- https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews


संबंधित बातम्या

Saam TV Live