VIDEO | औरंगाबादमध्ये भाविकांवर काळाचा घाला!

VIDEO | औरंगाबादमध्ये भाविकांवर काळाचा घाला!


करमाड (जि. औरंगाबाद) - इगतपुरीहून देवदर्शन करून सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) आणि जालन्याकडे परतणाऱ्या भाविकांची क्रुझर रस्त्यावर उभ्या असलेल्या मालवाहू ट्रेलरला धडकली. या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले. ही घटना आज (ता. 31 जानेवारी)  पहाटे तीनच्या सुमारास गाढेजळगाव शिवारात घडली. 

 माहितीनुसार,  क्रुझरमधील प्रवासी इगतपुरीहून देवदर्शन करून सिंदखेडराजाकडे (जि. बुलडाणा) परतत होते.  दरम्यान, करमाडजवळ  गाडेजळगाव शिवारात शुक्रवारी पहाटे भरधाव क्रुझर (MH28 AN 3620)रस्त्याच्या डाव्या बाजूला उभ्या असलेल्या मालवाहू ट्रेलरवर (MH40BJ8111)मागच्या बाजूने धडकली.  या भीषण अपघातात चार भाविक जागीच ठार झाले. तसेच पाच जण गंभीर जखमी झाले.


मृतांची नावे 
काशिनाथ देवराव मेहत्रे (६२)
रवी बबन जाधव (३२) दोघेही रा.नशिराबाद ता.शिंदखेडराजा
सांगीता गणेश बुंदे (४५) रा.तांदूळवाडी ता.शिंदखेडराजा
 ऋषीधर देवराव तिडके (५५) रा.गोंदेगाव ता.जी.जालना.

Web Title: Four Killed in Accident At Karmad
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com