सोलापूर महामार्गावर भीषण अपघातात चौघे ठार

मधुकर गलांडे
सोमवार, 7 जून 2021

अपघाताची माहिती कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय धोत्रे, सहाय्यक फौजदार नितिन ठोंबरे, हवालदार मड्डी, जाधव हे तातडीने अपघातस्थळी पोहोचले. वाहनांमध्ये अडकलेले मृतदेह बाजुला काढले.

भरधाव वेगातील कारचे टायर फुटून ती विरुध्द बाजुच्या रस्त्यावर येत, बोलेरो गाडीला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील एक व बोलेरोमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल पायल जवळ आज सोमवार (दि.७) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ज्योतिराम सूर्यभान पवार (वय ३६ वर्षे,रा.उलवे, रायगड), अविनाश कुंडलिक पवार(वय २८ वर्षे),गणेश पोपट गोडसे(वय ३८ वर्षे),बाळासाहेब चांगदेव साळुंखे (वय ४९ वर्षे,तिघे रा.गुरसाळे,  सोलापूर) अशी मयत झालेल्या इसमांची नावे आहेत.
 
या संदर्भात कळालेली माहिती अशी की, सोलापूर बाजूकडून भरधाव वेगात पुण्याच्या दिशेने निघालेल्या इर्टीका ( क्र.एम एच ४६ बी इ ४५१५) कारचे टायर  अचानक फुटल्याने ती डिव्हायडर तोडून विरुध्द बाजुच्या रस्त्यावर गेली. सोलापूरकडे जाणाऱ्या बुलेरो ( एम एच १३ ए झेड ३९० १) या गाडीला तिची जोरदार धडक बसल्याने हा अपघात घडला.

हे देखील पाहा

अपघाताची माहिती कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय धोत्रे, सहाय्यक फौजदार नितिन ठोंबरे, हवालदार मड्डी, जाधव हे तातडीने अपघातस्थळी पोहोचले. वाहनांमध्ये अडकलेले मृतदेह बाजुला काढले. पुढील तपासणीसाठी उपजिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले. पंचनामा करण्याचे काम सुरु होते.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live