नाटोली येथे चार धारदार तलवारी तरुणाकडून हस्तगत

विजय पाटील
शुक्रवार, 21 मे 2021

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील नाटोली येथील शेती विभाग कार्यालयाजवळ पोत्यामध्ये चार धारदार तलवारी घेऊन उभा असलेल्या तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून २ हजार ८०० रुपये किमतीच्या चार तलवारी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत... रोहन प्रताप नाकील वय २२ असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या विरोधात शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगली - सांगली Sangli जिल्ह्यातील शिराळा Shirala तालुक्यातील नाटोली Natoli येथील शेती विभाग कार्यालयाजवळ पोत्यामध्ये चार धारदार तलवारी swords घेऊन उभा असलेल्या तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद Confiscated केले आहे. त्याच्याकडून २ हजार ८०० रुपये किमतीच्या चार तलवारी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. रोहन प्रताप नाकील वय २२ असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या विरोधात शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Four sharp swords seized from a young man at Natoli

पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी पेट्रोलिंग करुन अवैध्य शस्त्रे बगळणाऱ्यांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी कारवाई करण्यासाठी पथक तैनात केले होते.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील एक पथक शिराळा पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली शिराळा बिऊर फाटा येथील शेती विभाग कार्यालयाजवळील क्वॉलिटी वडापाव सेंटरच्या दुकाना समोर एक व्यक्ती पोत्यामध्ये घातक शस्त्रे तलवारी घेऊन थांबला आहे. Four sharp swords seized from a young man at Natoli

गोव्यात लागू केलेल्या संचारबंदीत 31 मे पर्यंत वाढ

पथकाने त्याठिकाणी छापा मारून त्या व्यक्तीस ताब्यात घेतले.त्यावेळी त्याच्याकडून एका पांढऱ्या पोत्यातून एक लोखंडी बनावटीची तलवार जप्त केली. त्यास अजून विश्वासात घेवून सखोल चौकशी करता त्याने नाटोली येथे घरामध्ये लपवून ठेवलेले ३ तलवारी काढून दिल्या. त्याच्याकडून एकूण 2 हजार 800 रुपये किंमतीच्या एकूण 4 तलवारी जप्त करण्यात आल्या. पोलिसांनी मुद्देमाल ताब्यात घेतले असून संशयिता विरोधात शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule


संबंधित बातम्या

Saam TV Live