अकोल्यात रेमडिसिवीरचा काळाबाजार करणारे खासगी रुग्णालयांशी संबंधित

जयेश गावंडे
बुधवार, 28 एप्रिल 2021

रोना रुग्णांची  संख्या वाढत असताना कोरोना रुग्णांना संजीवनी ठरलेले रेमिडिसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. अकोल्यातही चढ्या दरात विक्री करणाऱ्या खाजगी आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या चौदा जणांना आतापर्यंत पोलिसांनी अटक केलीय

अकोला : कोरोना रुग्णांची  संख्या वाढत असताना कोरोना रुग्णांना संजीवनी ठरलेले रेमिडिसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. अकोल्यातही चढ्या दरात विक्री करणाऱ्या खाजगी आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या चौदा जणांना आतापर्यंत पोलिसांनी अटक केलीय. अटक करण्यात आलेले चौदाही जण हे खाजगी रुग्णालय आणि मेडिकल मधील कर्मचारी आहेत. Fourteen Arrested For Black Marketing of Remdisivir in Akola

रेमडीसिविरच्या काळाबाजारप्रकरणी आतापर्यत जवळपास १४ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील सर्व आरोपी हे खाजगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांपैकी आहेत.  अकोल्यातील ४ खाजगी रुग्णालयातील हा नर्सिंग स्टाफ असून ते रेमडीसिविरची विक्री तब्बल २५ हजाराला करायचे. सध्या या चारही खाजगी रुग्णालयातील नर्सिंग कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे. मात्र, या प्रकरणात आतापर्यत कुठल्याही संबंधित खाजगी रुग्णालय अथवा डॉक्टरांवर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. 

मिळालेल्या माहिती नुसार, कोरोना रुग्णाजवळ कुणीही नातेवाईक नसतो याचाच फायदा घेत आरोपींमध्ये समावेश असलेल्या नर्सिंग कर्मचाऱ्यांनी हे रेमडीसिविर इंजेक्शन जेथे काम करतात तेथून चोरल्याचं समोर आले,  असे असतांना देखील रुग्णालय यंत्रणेला याची माहिती किंवा डॉक्टरांनी रेमडीसिविर चोरी अथवा गहाळ झाल्याची साधी तक्रार सुद्धा दिली नाही.  दरम्यान, रुग्णाचे नातेवाईक महागडं असलेलं रेमडीसिविर  आणतात आणि रुग्णलयाच्या स्वाधीन करतात. मात्र, ते रुग्णांना देण्यात येते किंवा नाही हे पाहणं संबंधित डॉक्टरांचं काम आहे.  पण असे होतांना दिसत नाही. या प्रकारानंतर हलगर्जीपणा  करणाऱ्या डॉक्टरांवर काय कारवाई होणार याकड लक्ष लागले आहे. Fourteen Arrested For Black Marketing of Remdisivir in Akola

सध्यातरी या प्रकरणात पोलिसांकडून रुग्णालय कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली आहे. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या कारवाईने इंजेक्शनचा काळाबाजार थांबेल आणि गरजू रुग्णांना स्वस्त दारात रेमडिसिवीर इंजेक्शन उपलब्ध होतील. मात्र रुग्णांच्या भावनेशी आणि जीवाशी खेळणाऱ्याना कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. भविष्यात कुणीही अश्या प्रकारे टाळूवरचे लोणी खाण्याच्या प्रकार न होवो हीच अपेक्षा.

अनेक बड्या डॉक्टरांचाही सहभाग?
अकोल्यातील स्थानिक गुन्हे शाखेने रेमडेसिविरचा काळाबाजार करणाया टोळीचा पर्दाफाश केला आहे. ज्या मेडिकलमधून तसेच ज्या हॉस्पिटलमधील कोविड रुग्णांना
इंजेक्शन देण्यात येत होते किंवा नव्हते याची चौकशी करण्यात येत आहे. यामध्ये काही डॉक्टरांचा सहभाग असल्याची माहिती आता समोर आली आहे.
त्यामुळे मेडिकलचे संचालक व डॉक्टरांचीही चौकशी स्थानिक गुन्हे शाखेने सुरु केली असून त्यांनाही लवकरच बेड्या ठोकण्यात येणार असल्याची माहिती आहे.
Edited By - Amit Golwalkar


संबंधित बातम्या

Saam TV Live