जपानमध्ये कोरोनाची चौथी लाट; ऑलिंपिक पुढे ढकलण्याची मागणी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 14 मे 2021

जपानमध्ये कारोनाची चौथी लाट धडकलेली असताना सरकार मात्र ऑलिंपिक बाबत सकारात्मक आहे. त्यामुळे नागरिकांत तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. जपानमध्ये केवळ एक टक्केच लसीकरण झाले असून लाखो डोस फ्रिजरमध्ये पडून आहेत.

टोकियो : जपानमध्ये Japan कोरोनाची चौथी लाट Corona Fourth Wave धडकलेली असताना सरकार मात्र ऑलिंपिक Olympic Games बाबत सकारात्मक आहे. त्यामुळे नागरिकांत तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. जपानमध्ये केवळ एक टक्केच लसीकरण Vaccination झाले असून लाखो डोस फ्रिजरमध्ये पडून आहेत. Fourth Corona Wave Hits Japan Olympics Cancellation demand Increased

रुग्णालयातील जागेअभावी काही गंभीर रुग्णांना घरीच थांबावे लागत त्यांचा उपचाराअभावी मृत्यू होत असल्याचे धक्कादायक प्रकार घडत आहे. दरम्यान, जपानने आशियायी देशातून येणाऱ्या प्रवाशांवर Commuters कडक निर्बंध घातले आहेत. नवीन निर्बंध १४ मे पासूनच लागू झाले आहेत. त्यात भारत India, पाकिस्तान Pakistan, नेपाळ Nepal या देशांचा समावेश आहे.

हे देखिल पहा - 

जपानमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेने धडक मारली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा संपूर्णपणे कोलमडून पडली आहे. चौथ्या लाटेत नागरिकांचा घरातच मृत्यू होत असल्याचे दुर्दैवी चित्र पाहावयास मिळत आहे. जपानचे सरकार हतबल झाले असून नागरिकांचा संताप वाढत चालला आहे. बाधितांच्या संख्येच्या तुलनेत बेडची संख्या अपुरी पडू लागली आहे. ओसाका प्रांतात दोन महिन्यात १७ जणांचा घरातच मृत्यू झाला आहे. त्यांच्यात कोरोनाचे विषाणू आढळून आले आहेत. या रुग्णांना दवाखान्यात दाखल का केले नाही, याचे स्पष्टीकरण ओसाका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देता आले नाही. Fourth Corona Wave Hits Japan Olympics Cancellation demand Increased

देशातील बहुतांश रुग्णालये भरलेली असून कोरोनाबाधित आणि गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या नागरिकांना नाविलाजाने घरातच राहावे लागत आहे. काल ओसाका येथे चोवीस तासात कोरोनाचे ९७४ रुग्ण आढळून आले तर टोकियोत हीच संख्या १०१० होती. गेल्या शुक्रवारी ओसाका नर्सिंग होममध्ये ६१ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते.

इस्त्राईलने दिला हमासला दणका

त्यापैकी भरतीसाठी वाट पाहणाऱ्या चौदा जणांचा मृत्यू झाला.जपानमध्ये आतापर्यंत ६,५१ ७०२ जणांना कोरोनाची लागण झाली असून ११०६४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ७२०८० जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. पैकी १,१८९ रुग्ण गंभीर असल्याचे जपान आरोग्य विभागाने म्हटले आहे. Fourth Corona Wave Hits Japan Olympics Cancellation demand Increased

‘तर आम्ही राजकारणाचे बळी ठरु’
दुसरीकडे जपानमध्ये एका वर्तमानपत्रात संपूर्ण पानाची जाहिरात प्रसिद्ध करून देशातील लोक ‘राजकारणाला बळी’ पडत आहेत, असे म्हटले आहे. लस नाही, औषध नाही. आम्हाला श्‍वासाला भाला करून लढावे लागणार काय ? परिस्थितीत बदल झाला नाही तर आम्ही राजकारणाचे बळी ठरु, असे सरकारवर टीका करणारी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. जपानमध्ये केवळ एकच टक्के लसीकरण झाले आहे. तरीही ऑलिंपिक स्पर्धा सुरक्षितपणे पार पाडल्या जातील, असे पंतप्रधान सुगा सांगत आहेत. त्यामुळे खासदारांत नाराजी आणि संभ्रम निर्माण झाला आहे. काल जपानमध्ये अनेक ठिकाणी आणीबाणी लागू करण्यात आली. देशातील कोरोनाची स्थिती गंभीर होत असल्याचे पाहून तीन लाखाहून अधिक नागरिकांनी एका याचिकेवर हस्ताक्षर करून टोकियो ऑलिंपिक रद्द करण्याची मागणी केली आहे.
Edited By - Amit Golwalkar
 


संबंधित बातम्या

Saam TV Live