बनावट गाड्या विकणाऱ्या टोळीचा भंडाफोड

साम टीव्ही
शुक्रवार, 5 मार्च 2021

कुणी तुम्हाला स्वस्तात नवी कार देण्याचं आमिष दाखवलं तर सावधान भंगारात काढलेल्या जुन्या कार लोकांना स्वस्तात विकणाऱ्या टोळीचा नवी मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केलाय. 

कुणी तुम्हाला स्वस्तात नवी कार देण्याचं आमिष दाखवलं तर सावधान भंगारात काढलेल्या जुन्या कार लोकांना स्वस्तात विकणाऱ्या टोळीचा नवी मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केलाय. 

नवी कोरी कार दिसते पण ती नवी कोरी असेल असं नाही त्यामुळं स्वस्तात कार देतो या आमिषाला बळी पडू नका कारण तुम्ही खरेदी केलेली कार भंगार असण्याची शक्यता आहे. नवी मुंबई पोलिस मुख्यालयातल्या या कार पाहा या कार नव्या कोऱ्या आहेत. पण वस्तूस्थिती वेगळी आहे. या कार भंगार आहेत.  2020पासून सरकारनं BS4 वाहनांवर बंदी घातलीय. या नियमानुसार मारुती सुझूकीनं 406 कार भंगारात काढल्या होत्या. आरोपींनी या कार भंगारात विकत घेतल्या. त्यांचा चेसीनंबर बदलून या कार देशभरात विकण्यात आल्या. पोलिसांनी यातल्या 151 गाड्या जप्त करण्यात आल्या. 250 गाड्यांचा पोलिस शोध घेतायत. 

 हे प्रकरण पाहाता कोणीही नवी कोरी कार स्वस्तात देत असेल तर शंभरवेळा कागदपत्र आणि कारची खात्री करुन घ्या. अन्यथा तुमच्या पदरात जुनी भंगार कार पडेल त्यामुळं त्यामुळं राहा सावधान


फोटो

संबंधित बातम्या

Saam TV Live