इस्त्राईलकडून भारताला संरक्षणासाठी विनाअट, अमर्याद मदत

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

नवी दिल्ली - दहशतवादाविरोधात बचाव करण्यासाठी भारताला विना अट लागेल ती मदत करण्याचे आश्‍वासन इस्राईलने आज दिले. आम्ही तुम्हाला अमर्याद मदत करु, अशी ग्वाहीही इस्राईलने दिली आहे. दहशतवादी हल्ल्यांविरोधात कारवाईसाठी इस्राईलची पद्धत वापरण्याची मागणी सरकारकडे होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर इस्राईलने दिलेल्या या आश्‍वासनाला महत्व आले आहे. 

इस्राईलचे भारतातील नवे राजदूत डॉ. रॉन माल्का यांनी "पीटीआय'ला दिलेल्या मुलाखतीत भूमिका स्पष्ट केली. दहशतवादाचा बळी ठरत असलेल्या भारताला इस्राईल किती मदत करणार, या प्रश्‍नावर उत्तर देताना डॉ. माल्का यांनी वरील प्रतिक्रिया दिली. "बचावासाठी भारताला आमच्याकडे कोणत्याही प्रकारची मदत मागू शकतो. आम्ही आमच्या या जवळच्या मित्राला हरतऱ्हेची मदत करू. दहशतवाद हा केवळ भारत आणि इस्राईलचा प्रश्‍न नसून संपूर्ण जगाचा आहे. त्यामुळेच दहशतवादाविरोधात लढण्यासाठी आम्ही आमच्या या अत्यंत महत्त्वाच्या मित्राला सर्व प्रकारची माहिती आणि युद्धतंत्र देण्यास तयार आहोत,' असे ते म्हणाले. डॉ. माल्का हे इस्राईली सैन्यातून वरीष्ठ पदावरून निवृत्त झाले आहेत. इस्राईलचे अध्यक्ष बेंजामिन नेतान्याहू यांनी भारताचे महत्त्व सांगून त्यांना पूर्ण सहकार्य करण्याच्या सूचनाच आपल्याला दिल्या असल्याचे डॉ. माल्का यांनी सांगितले. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने इस्राईलच्या युद्धतंत्राचा वापर करण्याची मागणी होत आहे. अत्यंत अचून आणि वेगवान हल्ल्यासाठी इस्राईलचे सैन्य जगप्रसिद्ध आहे. 

Web Title: Free, immense help to protect India from terrarium

संबंधित बातम्या

Saam TV Live