बेडगच्या तरूणांकडून कोविड नातेवाईकांना मोफत जेवणाची सेवा

विजय पाटील
गुरुवार, 27 मे 2021

माणुसकीचे भान ठेवत या कोरोना Corona महामारीत गोर गरिब नातेवाईकांना मोफत जेवण देण्याचा स्तुत्य उपक्रम सांगलीच्या बेडग येथील तरुणांनी सुरू केला आहे. रोज 200 डबे जेवण मिरज सिव्हिल आणि म्हैसाळ येथे पोहचवले जात आहेत. 

सांगली - माणुसकीचे भान ठेवत या कोरोना Corona महामारीत गोर गरिब नातेवाईकांना मोफत जेवण देण्याचा स्तुत्य उपक्रम सांगलीच्या बेडग येथील तरुणांनी सुरू केला आहे. रोज 200 डबे जेवण मिरज सिव्हिल आणि म्हैसाळ येथे पोहचवले जात आहेत. त्याच्या हा मदतीचा हात माणुसकीचे दर्शन घडवत आहे. (Free meal service to Kovid relatives from Bedag's youth)

हे देखिल पहा - 

बेडग  येथील तरुणांनी एकत्र येऊनहा उपक्रम राबवला आहे. यामध्ये कै.किसनभाऊ आनंदा पाटील यांच्या स्मरणार्थ श्री. अमरसिंह दादा विलासराव पाटील, श्री.विष्णू आनंदा पाटील यांच्या सौजन्याने मिरज येथील कोरोना रूग्णालयात रूग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना  मोफत जेवण देत आहे. तसेच म्हैसाळ  येथील विलगीकरण कक्षातील रुग्णांना सकाळी आणि संध्याकाळी मोफत जेवण देत आहे.

हा उपक्रम गेल्या सहा दिवसांपासून सुरू केला आहे. दिवसभरात दोनशे लोकांना जेवण हे तरुण पोहचवत आहेत.  या उपक्रमात परिसरातील अनेक तरुण सहभागी होत आहेत. जेवणामध्ये दोन भाज्या, भात, आमटी, दोन चपाती असे जेवण काळजी घेऊन  तयार करून पॅकींग स्वरूपात पोहचवत आहे.

परभणीत पेट्रोल दर वाढ सुरूच !

त्यामुळे बाहेर गावाहून आलेल्या रूग्णांकडून आणि त्यांच्या नातेवाईकांकडून त्यांचे कौतुक मोठ्या प्रमाणात होत आहे. संकटाच्या समयी बेडगच्या तरुणांनी हा मदतीचा हात पुढे केल्याने माणुसकीचे दर्शन घडत आहे.

 

Edited By - Puja Bonkile 

 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live