कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांना मोफत जेवण : पाच तरुणांचा कौतुकास्पद उपक्रम

Free meals for Corona patient's relatives
Free meals for Corona patient's relatives

अहमदपूर - लॉकडाऊनमध्ये Lockdown ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण Corona patient शहरात उपचारासाठी आल्यानंतर त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची मोठी तारांबळ होत होती. लातूर जिल्ह्याच्या Latur District अहमदपूर येथील पाच तरुणांनी कोविड रुग्ण Corona patient आणि त्यांच्या नातेवाईकांना Relatives मोफत जेवणाचा डबा देण्याचा ठरविले. तसेच दररोज १५० ते २०० डबे गेल्या महिन्याभरापासून तीन हजार डबे या तरुण अन्नदूतांनी गरजूपर्यंत पोहचवले आहेत. (Free meals for Corona patient's relatives: Admirable activities of five young people)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका हा खेड्या-पाड्यातील रुग्णांना मोठ्या प्रमाणात बसला आहे.  त्यामुळे उपचारासाठी ग्रामीण भागातील नागरिक हे शहरात येतात. पण शहरात उपचार तर मिळतात परंतु  कोरोना रुग्ण आणि नातेवाईकांची दोन वेळेच्या जेवणाची मोठी गैरसोय होते. ही बाब लक्षात घेता लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर येथील विलास शेटे, शंकर मुळे, नयुम शेख, गोपीनाथ जायभाये आणि माधव भदाडे या पाच तरुणांनी हा उपक्रम सुरू केला आहे. 

हे देखील पहा - 

त्यामुळे कोरोना रुग्ण आणि नातेवाईकांसाठी दोन वेळच्या जेवणाचा डबा देण्याचे या तरुणांनी ठरविले. यासाठी या पाचही जणांनी काँट्रीब्युशन करून काही रक्कम जमा केली. तसेच कोविड रुग्णांसाठी जेवणाचे डबे बनविण्यास सुरुवात केली. वरण, भात, भाजी, 3 चपाती, खीर, सलाद आणि शेंगदाने अशा पद्धतीचे जेवण या डब्यात असते. 

अहमदपूर शहरातील 26 एप्रिलपासून  4 कोविड हॉस्पिटल, शासकीय ग्रामीण रुग्णालय, रस्त्यावरील मनोरुग्ण तसेच होम आयसोलेशनमधील रुग्णांसाठी दररोज 150 ते 200 डब्यांनुसार आजवर तीन हजार डबे पुरविण्यात आले आहेत. कोविड हॉस्पिटल आणि इतर रुग्णालयात गरजूपर्यंत हे तरुण दुपारी 12 आणि संध्याकाळी 8 वाजता स्वतः जाऊन डबे पुरवतात. त्यामुळे कोविड रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना दोन  वेळचे उत्तम प्रतीचे, रुचकर जेवण मिळत आहे अशी माहिती अन्नछात्र चालक गोपीनाथ जायभये यांनी माहिती दिली. 

एकीकडे लॉकडाऊनमध्ये जेवण कसे आणायचे हा मोठा प्रश्न रुग्णांच्या नातेवाइकांपुढे होता. परंतु या पाच तरुणांनी जेवणाची मोठी अडचण सोडविल्यामुळे रुग्ण आणि नातेवाईक या तरुणांचे आभार मानत आहेत.

Edited By - Puja Bonkile 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com