साम टिव्ही इंपॅक्ट : नंदुरबारमध्ये मोफत शिवभोजनाला सुरुवात....

दिनू गावित
शनिवार, 17 एप्रिल 2021

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केलेली आहे. दरम्यान संचारबंदीत गरजू व गरीब लोकांना शासनाने शिवभोजन थाळी मोफत देण्याचे जाहीर केले होते

नंदुरबार : कोरोनाचा Corona प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी Curfew लागू केला आहे. दरम्यान संचारबंदीत गरजू व गरीब लोकांना शासनाने शिवभोजन थाळी Shivbhojan Thali मोफत देण्याचे जाहीर केले होते. परंतु याचा प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याचे 'साम टिव्ही'ने निर्दशनास आणून दिल्याने नंदुरबार Nandurbar जिल्ह्यात आजपासून शिव भोजन केंद्रांवर प्रत्यक्ष गरजू आणि गरीबांसाठी मोफत शिवभोजन थाळी वाटप सुरू करण्यात आली आहे. Free Shivbhojan Meal Started in Nandurbar After Saam TV News

संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने Maharashtra संपूर्ण राज्यात मिशन ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध Restrictions लागू केले आहेत. त्याअनुषंगाने मोठा निर्णय घेत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ Chagan Bhujbal यांनी राज्यात शिवभोजन थाळी ही पार्सल Parcel स्वरूपात जनतेला उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला.

शहादा तालुक्यातील भाजी मार्केट मधील शिवभोजन केंद्रावर १२५ गरजू नागरिकांना शिवभोजन थाळी पार्सलद्वारे वाटप करण्यात आली आहे. यावेळी लाभार्थ्यांनी शासनाचे व साम टिव्हीचे Saam Tv आभार मानले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील मोफत शिवभोजन थाळी सुरू करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. Free Shivbhojan Meal Started in Nandurbar After Saam TV News

कोरोना काळात मजूर, कामगार, शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेला शिवभोजन थाळी मोठा आधार ठरत आहे. मात्र राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे सर्व हॉटेल, रेस्टॅारंट यांना पार्सल सुविधा देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळेच आता शिवभोजन केंद्रावर देखील शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात उपलब्ध होणार आहे.

Edited By- Digambar Jadhav


संबंधित बातम्या

Saam TV Live