जुन्या भांडणाची कुरापत काढून दोन गटात काट्या कुऱ्हाडीने फ्री स्टाईल हाणामारी

विनोद जिरे
सोमवार, 24 मे 2021

जुन्या भांडणाची कुरापत काढून, दोन गटात काट्या कुऱ्हाडीने फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. या हाणामारीत एकाचं कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

बीड:  जुन्या भांडणाची कुरापत काढून, दोन गटात काट्या कुऱ्हाडीने फ्री स्टाईल हाणामारी Fight झाली आहे. या हाणामारीत एकाचं कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बीडच्या Beed कामखेडा गावातील पवार तांड्यावर, रात्री 8 च्या दरम्यान घडली असून हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर social media व्हायरल झाला आहे. Freestyle fight with a sharp ax in two groups

हे देखील पहा -

कामखेडा येथील पवार तांड्यावरील सर्व लमाण बांधव ऊसतोड मजूर आहेत. यात पवार भावकी-भावकीत जुन्या वादातून रात्री कोयता कुऱ्हाडीने जबर फ्री स्टाईल हाणामारी झाली. या हाणामारीत सुरेश पांडुरंग पवार (वय 32), संतोष विठ्ठल पवार (वय 36), सुनील बंडू पवार (वय 22), निलाबाई अंकुश आढे (वय 45) व रमेश पवार (वय 25) हे गंभीर जखमी झाले आहेत.

संचारबंदीचे उल्लंघन केलेल्या दुकानावर बुलडाणा नगर पालिकेने ठोठावला दंड

पाच जणांवर स्थलांतरित जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू.दरम्यान बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Edited By- Sanika Gade


संबंधित बातम्या

Saam TV Live