किरकोळ 30 रुपयांच्या कारणावरून मित्राने केला मित्राचा खून

विजय पाटील
गुरुवार, 20 मे 2021

जत तालुक्यातील तोळबळवाडी ( मुचंडी ) येथे तीस रुपये मागितल्याच्या कारणावरून तरुणाचा गळा धरून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत व त्याच्या छातीवर गंभीर जखमा करून मित्रानेच खून केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

सांगली : सांगलीच्या Sangli जत Jat तालुक्यातील तोळबळवाडी ( मुचंडी ) येथे तीस रुपये मागितल्याच्या कारणावरून तरुणाचा गळा धरून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे. त्याच्या छातीवर गंभीर जखमा करून मित्रानेच खून Murder केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. Friend Murdered A Friend For a Small Amount Of 30 Rupees

अरुण शामू मलमे वय २० असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना कन्नड शाळेजवळ मंगळवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मयत तरुणाचे वडील गुंडा मलमे यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे. खून केल्याच्या कारणावरून संशयित आरोपी रमेश फकीराप्पा पाटोळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार तो फरार आहे. 

हे देखील पहा -

मुचंडीपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या तोळबळवाडी येथे मित्र Friend असणारे अरुण मलमे व रमेश पाटोळे राहत होते. मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास संशयित रमेश हा अरुणला तीस रुपये देण्यासाठी गेला यावेळी दोघांचे भांडणे झाले. Friend Murdered A Friend For a Small Amount Of 30 Rupees

सांगली शासकीय कोरोना रुग्णालयातील 31 डॉक्टरांची तडका-फडकी सातारा येथे बदली

यावेळी रमेशने अरुणचा गळा धरून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारून ढकलून दिले व खाली पडल्यावर रमेशने छतीवर बसून अरुणला जखमी केले. यात अरुणचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनास्थळावरून रमेश फरारी झाला आहे. सदर घटना समजताच जत पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे रमेशचा शोध व अधिक तपास जत पोलीस Police करत आहेत. 

Edited By : Krushnarav Sathe 


संबंधित बातम्या

Saam TV Live